Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा

करकंब पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करकंब प्रतिनिधी    महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधी...

करकंब पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा

करकंब प्रतिनिधी

   महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधीत पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहांतर्गत सोमवारी दिनांक 02/01/2023 रोजी रेझिंग डे  निमित्त करकंब पोलीस ठाणे येथे आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज , न्यू इंग्लिश स्कूल , रामभाऊ जोशी हायस्कूल , सह्याद्री आयटीआय कॉलेज मधील इयत्ता नववी व दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाजाबाबत सर्व माहिती देण्यात आले.

 पोलीस ठाणे कडील सर्व विभागाचे तसेच पोलीस ठाणे कडे उपलब्ध असलेले काठ्या, बंदुका आदी शस्त्र संबंधीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आले, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी ठाणे अंमलदार ,  गोपनीय विभाग , वायरलेस विभाग, क्राइम विभाग, बिट अंमलदार मुख्य अधिकारी आदी विभाग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले तसेच उपस्थित  150 ते 200 विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक आदींना सपोनि निलेश तारु यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी  सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत कवितकर, पोहेकॉ  दादासाहेब सुळ, पोहेकॉ बालाजी घोळवे, पोना संतोष पाटेकर, पोना दत्तात्रय वाघमारे, पोना मयूर गव्हाणे, पोकॉ रमेश फुगे इ. पोलीस अंमलदार हजर होते.

फोटो ओळ

करकंब येथील पोलीस ठाण्यात शस्त्रांची माहिती देताना सपोनि निलेश तारु, पोउनि शशिकांत कवितकर आदींसह पोलिस, शिक्षक व विद्यार्थी