Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आमदार बबनदादा शिंदे यांनी नुकसानग्रस्त केळीची केली पाहणी

करकंब(प्रतिनिधी) :-     या वादळी वाऱ्यामुळे करकंब,नेमतवाडी,पेहे,नांदोरे येथील नुकसान झालेल्या केळी पिकाची पाहणी केली .      यावे...

करकंब(प्रतिनिधी) :-
    या वादळी वाऱ्यामुळे करकंब,नेमतवाडी,पेहे,नांदोरे येथील नुकसान झालेल्या केळी पिकाची पाहणी केली .
     यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून हेक्टरी 22 हजार पाचशे रु. मिळत असल्याचे सांगितले जात असून या मिळणाऱ्या रकमेतून नुकसानीच्या क्षेत्रातील मेहनत करणेही शक्य होत नसल्याचे सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. त्यामुळे जास्तीची भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी आ.शिंदे यांच्याकडे केली.यावर बोलताना आ.शिंदे यांनी ज्या ज्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून जास्तीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी यासंदर्भात चर्चा झाली असून आपण योग्य तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ असे सांगितले.
  यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण,शेतकी अधिकारी बाबूराव इंगोले,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, ग्रा.पं.सदस्य विवेक,शिंगटे, राहुल शिंगटे,अजितसिंह देशमुख,बाळासाहेब गुळमे,सहकार शिरोमणीचे संचालक अमोल माने,नेमतवाडीचे सरपंच अभिजित पाटील,नवनाथ माने,सुधीर व्यवहारे,पेहेचे सरपंच सोमनाथ गायकवाड,सचिन मांजरे, मधुकर गायकवाड, शहाजी पाटील,सत्यवान कारंडे,राजाराम भिंगारे,डॉ.संतोष वलगे,कांतीलाल भिंगारे, गणेश खेडेकर,तलाठी,ग्रामसेवक उपस्थित होते.
    
     करकंब - नांदोरे रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी 
    आ.बबनदादा शिंदे हे नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता येथील उपस्थित ग्रामस्थांनी करकंब-नांदोरे रस्त्याच्या कामाचे उदघाटन होऊन तीन ते चार महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप काही ठिकाणी काम सुरू करण्याचा केवळ दिखावा केला आहे त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या असल्याबाबतची कैफियत आ.शिंदे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी  मांडली.यावर आ.शिंदे यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले असल्याचे सांगितले.