Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक जळोली शाळेतील ५ विद्यार्थी राज्यस्तरीय ए टी एस प्रज्ञा शोध परीक्षेत भरघोस यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेने राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञा शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यशाची परंपरा कायम र...


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेने राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञा शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यशाची परंपरा कायम राखली.यामध्ये उंबरे केंद्रात  इयत्ता ७वी.उपासना अमोल नरसाळे (केंद्रात प्रथम) ६वी पूजा पोपट पवार (केंद्रात प्रथम)४थी शुभम शिवाजी  नरसाळे (केंद्रात तृतीय)३री रुद्र ज्ञानेश्वर नरसाळे (केंद्रात तृतीय) श्रृती शहाजी नरसाळे (केंद्रात सहावा) या विद्यार्थी विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून जळोली शाळेची यशाची परंपरा कायम राखत यश संपादन करत त्यांना मुख्याध्यापक गणपत मोरे, सहशिक्षक जयवंत कापसे, शिवाजी गोरे, रमेश खारे, कैलास नरसाळे, सोमनाथ पवार आणि देवकी कलढोणे-दुधाणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा,क्रिडा स्पर्धा,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातही यशस्वी सहभाग असल्याने जळोली शाळेने पंढरपूर तालुक्यात आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व  सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी अभिनंदन करत अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच पुढील काळात आपले मुल जिल्हा परिषद शाळेतच दाखल करुन आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन मुख्याध्यापक गणपत मोरे यांनी केले.