Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले

करकंब मध्ये रात्री सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले  करकंब प्रतिनिधी अवकाळी पाऊस व अचानक वाऱ्याचे झाल्यामुळे करक...

करकंब मध्ये रात्री सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले 
करकंब प्रतिनिधी
अवकाळी पाऊस व अचानक वाऱ्याचे झाल्यामुळे करकंब मधील वीज पुरवठा खंडित होत आहे.
किरकोळ वारे व पावसामध्ये नेहमीच वीजपुरवठा खंडित होत असल्याचे तक्रारी वाढत आहेत.ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
परवा करकंब नगरीमध्ये  सहा वाजता लाईट गुल झाली ती रात्री एक वाजता आली.
करकंब गावामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठ्याच्या तारांना फांद्या स्पर्श करतात त्यामुळे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे .
मोजके वीज कर्मचारी हे एक कारण असले तरी रात्री अपरात्री सात तास वीज पुरवठा खंडित होताना पहाण्याचा अनुभव सातत्याने पहायला मिळत आहे. यासाठी प्रशासनाने, महावितरण कंपनीने विशेष लक्ष देऊन हे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
पूर्वी सारखे रॉकेल उपलब्ध  होत नाही. दिवाबत्तीची सोय करायचे म्हटले तर एकमेव पर्याय मेणबत्तीमुळे धोका होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी वीज पुरवठा सुरळीत रहाणे गरजेचे आहे‌. करकंबमध्ये असणारे ग्रामीण रुग्णालयामध्ये असणारी लहान मुलं, शस्त्रक्रिया झालेल्या महिला यांना या यामुळे त्रास होत आहे.मोठमोठे हॉस्पिटल छोटे-मोठे उद्योजक, कारखानदार यांना याचा फटका बसत आहे. 
उन्हाळ्याचे, उकाड्याचे दिवस आहेत. त्यामध्ये कोल्ड्रिंक्स विक्री करणारे छोटे - मोठे व्यापारी असतील अशा व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. छोट्या मोठ्या चोऱ्या अंधाराचा फायदा घेऊन होत असतात. लहान मुलं व वृद्ध लोकांना लाईट गेल्यामुळे हा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. हा वीज पुरवठा नेहमीच सुरळीत व चांगल्या पद्धतीने सुरू करावा वाऱी अगोदर सर्व कामे पूर्ण करून करकंबला सर्व वीज पुरवठा खंडित न होता ग्राहकांना चांगली सेवा मिळावी अशी मागणी ग्राहकांतून, नागरिकांतून होत आहे.