Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशालेची दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

प्रशालेचा 2023-24 चा इयत्ता दहावीचा निकाल ८४%  लागला. ज्यामध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. रिद्धी मकरंद हरिदास (९४%), द्वितीय...

प्रशालेचा 2023-24 चा इयत्ता दहावीचा निकाल ८४%  लागला. ज्यामध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. रिद्धी मकरंद हरिदास (९४%), द्वितीय क्रमांक कु. सिद्धी मकरंद हरिदास (९३.२०%), तृतीय क्रमांक चि. तेजस समीर डांगे (९२.२०%), तसेच कु. राधिका प्रकाश जबडे (९२%) या विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत घवघवीत व उज्ज्वल यश संपादन केले.
उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण ४  विद्यार्थ्यांनी‌ मिळवले, ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ५ विद्यार्थी, ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ११ विद्यार्थी, ६०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे २९ विद्यार्थी, ५०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १९  विद्यार्थ्यांनी गुण मिळवत उज्वल यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
संस्थेचे सचिव बी. जे. डांगे, अध्यक्ष बाळासाहेब वरूडकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय धारूरकर आणि पर्यवेक्षक अनिल अभंगराव यांनी विद्यार्थ्यांचा हार, गुलाब पुष्प आणि पेढे देऊन सत्कार केला व भावी शैक्षणिक कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.