Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

♦️करकंब येथे एकलव्य अभ्यासिकेच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने "मी यशस्वी होणारच"स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन♦️शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना"एकलव्य पुरस्कार"यंदापासून सुरु करणार

श्री.काशिनाथ भतगुणकी यांचे मार्गदर्शन आणि दहावी बारावी विद्यार्थी विद्यार्थिनींचाही होणार सत्कार सोहळा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 करकंब:-क...


श्री.काशिनाथ भतगुणकी यांचे मार्गदर्शन आणि दहावी बारावी विद्यार्थी विद्यार्थिनींचाही होणार सत्कार सोहळा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
करकंब:-करकंब येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य अभ्यासिकेची सुरुवात केली होती. एकलव्य अभ्यासिकेला आज वर्ष पूर्ण होत आहे.आणि या वर्षपूर्ती सोहळा निमित्ताने "मी यशस्वी होणारच" सोलापूर येथील स्पर्धा परीक्षेचे व्याख्याते काशिनाथ भतगुणकी यांचे मार्गदर्शन शनिवार दिनांक २२ जून रोजी सकाळी १० वा श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे आयोजित करण्यात आले असून याचवेळी करकंब मधील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा "एकलव्य पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच करकंब येथील दहावी बारावी मधील प्रत्येक शाळेमधील पहिल्या तीन क्रमांकामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या विजया उंडे,मुख्याध्यापिका संगीता बुगड, प्राचार्य हेमंत कदम, प्राचार्य अजीत पवार,किसन सलगर, मुख्याध्यापक मधुकर लोकरे यांची उपस्थिती राहणार आहे.तरी जागृत पालक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि करकंबकर ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकलव्य अभ्यासिकेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले असून अध्यक्ष रघुनाथ जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे हरिश्चंद्र वास्ते प्रमोद रेडे पाटील पांडुरंग काटवटे संतोष भोसले राजेंद्र करपे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विद्यार्थी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके, प्राप्त करून दिली असून सर्वं सोयींनी परिपूर्ण अशी सुसज्ज एकलव्य अभ्यासिका करकंब येथे यशस्वीपणे चालू आहे.या एकलव्य अभ्यासिकेचा करकंब व करकंब पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रवेश घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आवाहन एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
📗📕📘📙📕📗📘📙