Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

गॅलॅक्सि इंग्लिश मिडीयम स्कूल करकंब आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचा सांगता समारंभ शाॅर्ट फिल्मने संपन्न

करकंब: गत वीस वर्षांपासून नवोपक्रम राबवून विद्यार्थी ज्ञानसंपन्न घडवित त्याच्या सुप्त गुणांना वाव देत सर्जनशील विचारांनी चालवली ...

करकंब: गत वीस वर्षांपासून नवोपक्रम राबवून विद्यार्थी ज्ञानसंपन्न घडवित त्याच्या सुप्त गुणांना वाव देत सर्जनशील विचारांनी चालवली जाणाऱ्या प्रशालेने विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सत्कारणी लागावी या हेतूने, संस्कार व शिक्षण व कलांबाबत अभिरुची निर्माण व्हावी या हेतूने शाळांचे बंधन न ठेवता सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआयचे माजी शाखाधिकारी विजय भागवत , सचिन शिंदे अंकल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. 
नाममात्र नोंदणी शुल्क आकारून शिबीर नि: शुल्क होते. विविधांगी विषयांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी व त्या पध्दतीने दृष्टिकोन तयार होण्याच्या दृष्टीने पालकांनी सांगता समारंभात समाधान व्यक्त केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे लहान मुलांच्या विश्वाला अनुसरून शिबीरार्थी विद्यार्थी व पालकांना घेऊन एक लघुपट चित्रीत करण्यात आला. सांगता समारंभादिवशी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. पालकांसह लहान मुलांना विविध भूमिका देऊन या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. एरवी पडद्यावर इतर कलाकार पहात असताना इथे मात्र स्वतःलाच पडद्यावर पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाला पारावार उरला नव्हता. ते सर्व शिबीरार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर तो आनंद पहायला मिळत होता.

 karkambdarshan: Fruit day celebration 
#schooltrip #school #fruit #reels #recipe #fruitsalad
https://www.instagram.com/reel/C7CBnKcP9Ji/?igsh=MTZyMmc5ZGR2c3Nmcw==

 karkambdarshan: Day 4 GEMS PERSONALITY DEVELOPMENT SUMMER CAMP #school #Summer Camp #Art #craft
https://www.instagram.com/reel/C6-4FW5PMga/?igsh=MTBvb2xicnZ5aTJoZg==

 karkambdarshan: Day three art and craft Galaxy English Medium School karkamb ##schooltrip #school #art #craft
https://www.instagram.com/reel/C650TYcvUcE/?igsh=czNwYmJkdTNqcmw=

 karkambdarshan: Mother's day celebration in Galaxy English medium summer camp 

#mothersday #mother #motherlove #greetingcards #summertime #summervibes #school
https://www.instagram.com/reel/C631xrVPRn2/?igsh=MTU2bGdya3kycW9wdA==

 karkambdarshan: 1st day of our amazing summer camp GALAXY ENGLISH MEDIUM SCHOOL KARKAMB..

#schooltrip #school #summer #summertime #summercamp #kids #games #gamesworkshop
https://www.instagram.com/reel/C61SjFcIouT/?igsh=aWwxYXV6M21tYjRk

 karkambdarshan: https://www.instagram.com/reel/C6rGu9nvtvS/?igsh=YWI5Z2RiMzMwbWli

 संचालिका अपूर्वा थिटे यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले. सदर लघुपटाची संकल्पना सौ. थिटे मॅडम यांची होती तर कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अनुष्का थिटे यांनी केले, तर छायाचित्रणाची बाजू सारांश (भाई) यांनी समर्थपणे सांभाळली तर  नेपथ्य, प्रकाशयोजना या बाबी बालाजी क्षीरसागर व विकी जगताप यांनी सांभाळली. लवकरच हा लघु चित्रपट करकंब दर्शन यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक व करकंब दर्शनच्या कार्यकारी संपादक अनुष्का थिटे यांनी सांगितले.