Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आठवणीतील नाना अर्थात थिटे सर

चिरस्मरणीय नाना रस्त्याच्या कडेला फळे विकायला महिला बसलेली तेही उन्हाचा आडोसा धरून. त्यांचाकडून कलींगड घेतलं. माझ्या स्वभाव गुणध...

चिरस्मरणीय नाना

रस्त्याच्या कडेला फळे विकायला महिला बसलेली तेही उन्हाचा आडोसा धरून. त्यांचाकडून कलींगड घेतलं. माझ्या स्वभाव गुणधर्मामुळे थोडं 
बोलणं झालं. पुन्हा साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच ताईंकडून कलींगड घेण्यासाठी थांबलो. त्यांच्या पलीकडे साधारण साठीच्या आसपासचा एक गृहस्थ बसलेला. त्यांना माझ्याबद्दल का उत्सुकता वाटली काही समजलं नाही. कदाचित माझ्या बोलक्या स्वभावामुळे त्यांना बोलावंसं वाटलं असावं. त्यांनी सर्व प्रथम माझ्या गावाबद्दल विचारले. सहिजिकच 'करकंब' सांगितले. त्यांचा लगेचच पुढचा प्रश्न आला. "थिटे सरांना ओळखता का?" मला आश्चर्य वाटले ते संवाद चालू ठेवत पुढे म्हणाले की आम्हांला ते ड्राईंग शिकवायचे करकंबच्या हायस्कूलमध्ये. पुढे बोलताना ते म्हणाले "मी तुळशीचा, माझं शिक्षण करकंबच्याच हायस्कूलमध्ये झाले." मी म्हणालो "अहो ते माझे वडीलच". मग मात्र त्यांना किती बोलू किती नको असे झाले. "मी घरी या" असे निमंत्रण देऊन निघालो. एक निष्ठावान शिक्षक विद्यार्थ्यांमधिल स्मृतीच्या रूपाने अजरामर राहू शकतो याचे उदाहरण मला पाहायला मिळाले आणि मी शिक्षक असल्याचे समाधानही वाटले. 

- साथि (9011634250)