Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बालिका दिनानिमित्त जानकर वस्ती शाळेत महिला व त्यांचे आरोग्य याविषयी उद्बोधन मार्गदर्शन

बालिका दिनानिमित्त जानकर वस्ती शाळेत महिला व त्यांचे आरोग्य याविषयी उद्बोधन मार्गदर्शन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व...


बालिका दिनानिमित्त जानकर वस्ती शाळेत महिला व त्यांचे आरोग्य याविषयी उद्बोधन मार्गदर्शन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानकर वस्ती, केंद्र-करकंब ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे मुले आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी डॉ. मोनाली पारेकर व डॉ. मंजुश्री वाघ मोरे यांचे मार्गदर्शन झाले.  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याची माहिती सांगण्यात आली. आजची महिला ही आधुनिक महिला आहे, माहिती व तंत्रज्ञानाच्या स्फोट होत असताना जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे अनेक नवीन समस्या प्रकर्षाने जाणवते आहेत. मधुमेह, कँसर, रक्तदाब यासारख्या समस्यांसह मानसिक आजार, संधिवात, कोरोना महामारी, गरोदरपण, चाळिशी नंतर उद्भवणारे आजार इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन डॉ.मोनाली पारेकर यांनी केले. मुलांचे पोषण आणि त्यांना होणाऱ्या आजारांची लक्षणे, उपाय याविषयी जनजागृती चे महत्व त्याचप्रमाणे स्त्रियांच्या आजार आणि उपलब्ध असलेल्या सेवा सुविधा, निदान करण्याची साधने , समज -गैरसमज इ. बाबींचे मार्गदर्शन डॉ मंजुश्री मोरे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव मॅडम यांनी आजच्या काळातील महिलांची बदलती भूमिका यावर माहिती सांगितली. शाळेतील सर्व मतापालक बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सविता मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन रेश्मा टेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब घाडगे, उपशिक्षक फैयाज इनामदार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी माणिक जानकर व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.