Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

स्व.दत्तात्रय खारे यांच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करकंबकरांसाठी सदैव प्रेरणादायी

स्व.दत्तात्रय खारे यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करकंबकरांसाठी सदैव प्रेरणादायी स्व.दत्तात्रय खारे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने करकं...

स्व.दत्तात्रय खारे यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करकंबकरांसाठी सदैव प्रेरणादायी

स्व.दत्तात्रय खारे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने करकंब येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहिली,यावेळी करकंब येथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला स्व.दत्तात्रय खारे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच पूजन मा.आमदार नारायण आबा पाटील,श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील उपाध्यक्ष बी.पी.रोंगे सर,पांडूरंग परिवाराचे नेते प्रणवमालक परिचारक, बाळासाहेब देशमुख,राहुल काका पुरवत,ए.पी.आय.निलेशजी तारु,बाबुराव जी जाधव, दत्तात्रय नरसाळे,अरुण बनकर,अभिषेक पुरवत, अमोल दादा शेळके,अतुल माळी,लक्ष्मण वंजारी,सतिश देशमुख, यांच्या उपस्थितीत करण्यात आले,त्यावेळी सर्व मान्यवरांनी स्व.दत्तात्रय खारे यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील कामाचा उल्लेख करताना सांगितले की कनकंबा गृपच्या माध्यमातून करकंब गावांसाठी न भुतो न भविष्यती असा सामूहिक विवाह सोहळा संपन्न केला,प्रत्येक वर्षी विक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन,करत,कनकंबा दुध डेअरीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले,कोणताही मनुष्य रिकाम्या हातानं माघारी जात नव्हता.इतकी प्रेमाची माणसे दत्तात्रय खारे या तरुण युवकान जोडली होती,कोरोनाच्या या भयानक महामारीत सर्वांना वाचवता वाचवता स्वतःचा देह झिजवत करकंबकरांच भुषण असणारे स्व दत्तात्रय खारे आपल्याला सोडून गेले,त्यांचं हे कपूर राहिलेलं कार्य निश्चितच कनकंबा गृप,स्व दत्तात्रय खारे प्रतिष्ठान, कनकंबा दुध डेअरीच्या माध्यमातून सदैव तेवत ठेऊन करकंब गावचा विकास साधण्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील,सांगून सर्वांनी आदरांजली वाहिली,यावेळी रामेश्वर खाडे,योगेश काटवटे,प रामदास माने,रमेश‌ खारे, डॉ नितीन खाडे,सचिन शिंदे, पांडुरंग शेटे, श्रीकांत आरोळे,लक्ष्मण जाधव,पिनू देशमुख,नाना माळी,प्रकाश सुरवसे, तुषार खाडे,विष्णू शेटे,शंकर मदने, पांडुरंग काटवटे,आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करुन रमेश खारे यांनी आभार मानले.याच निमित्ताने या रविवारी दिनांक ८जानेवारी कनकंबा मंदिरामध्ये भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व दत्तात्रय खारे यांची आठवण जागृत ठेवावी.