Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

कोष्टी कला मंच नाशिक येथील राज्यस्तरीय कोष्टी कलारत्न पुरस्काराने ज्ञानेश्वर दुधाणे सन्मानित

कोष्टी कला मंच नाशिक येथील राज्यस्तरीय कोष्टी कलारत्न पुरस्काराने ज्ञानेश्वर दुधाणे सन्मानित करकंब कोष्टी कला मंच नाशिक यांचे वतीने दिला जाण...

कोष्टी कला मंच नाशिक येथील राज्यस्तरीय कोष्टी कलारत्न पुरस्काराने ज्ञानेश्वर दुधाणे सन्मानित

करकंब कोष्टी कला मंच नाशिक यांचे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कोष्टी कलारत्न पुरस्कार करकंब येथील पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना विटा नगरपरिषद चे मा.उपनगराध्यक्ष किरण तारळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

सुरुवातीला महाराष्ट्र कोष्टी संघाचे अध्यक्ष प्रकाशरावजी सतापुते, राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजयजी लोळे मा.उपनगराध्यक्ष किरणजी तारळकर,कोष्टी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विजयजी कलढोणे,उमेशजी ढगे,कोष्टी कला मंचचे अध्यक्ष रविंद्र भुजबळ, आदींच्या शुभहस्ते शाकंभरी मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली,त्यानंतर प्रकाश सातपुते यांनी मनोगतात सांगितले की कोष्टी कला मंच हे कोष्टी समाजातील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून या माध्यमातून अनेक नवनवीन कलाकार निर्माण होण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार असून अनेक कोष्टी समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघ काम करीत असून महाराष्ट्रातील सर्व चौंडेश्वरी मंदिरांना भेट देऊन समाजबांधवांची भेट घेण्यासाठी संपर्क साधला जात आहे,लवकरच कोष्टी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी इचलकरंजी येथे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले,त्यानंतर विजयजी लोळे यांनी सांगितले की मनुष्याला शाश्वत सुख मिळवायचे असेल तर निसर्ग आणि संगीताच्या माध्यमातूनच मिळवता येतो,आणि हे कोष्टी कला मंच हा आनंद देत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोष्टी समाजातील अनेक क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देतात त्यांना कोष्टी कला रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये येवला येथील प्रसिद्ध पैठणी विणकर गणपतराव आवणकर, करकंब येथील प्रसिद्ध पखवाज वादक  प्राथमिक शिक्षक पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या करकंब येथील श्री ज्ञानेश्वर दुधाणे, अभिनेत्री स्वरदा ठिगळे की सोनी मराठी या चनल वर सुराज्य तारामती मालिकेत  तारामती राणीची भुमिका साकारत आहे,कॅमेरामन की ज्यांनी अनेक हिंदी चित्रपट क्षेत्रात पडद्यापाठीमागे मोलाची भुमिका निभावली आहे ते विजयजी वरूडे,कथ्थक नृत्यांगना सायली होगाडे,आणि कोष्टी कला सेवा पुरस्कार रविंद्र गोडवे यांना मान्यवरांच्या हस्ते अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

त्यानंतर कोष्टी कला मंचच्या सहयोगाने तयार झालेल्या कलाकारांचा संगीत महोत्सव संपन्न झाला विविध कलाकारांनी आपली कला सादर केली,तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये उखाना स्पर्धेमध्ये आशा टकले करकंब यांचा प्रथम क्रमांक,द्वितीय तर आरती म्हेत्रे यांचा तृतीय क्रमांक पटकावला या संपूर्ण सोहळ्याचे अतिशय सुंदर खुमासदार शैलीत सुत्रसंचलन सिध्दार्थ पन्हाळे यांनी केले,अतिशय सुंदर कार्यक्रम झाल्याच्या आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.