Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर

श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करकंब प्रतिनिधी:-श्री चौंडेश...

श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर
करकंब प्रतिनिधी:-श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजभूषण पुरस्कार,कै.गोरख तात्या इदाते स्मृती पुरस्कार आणि कै.पंढरीनाथ आण्णा दुधाणे स्मृती पुरस्कार जाहीर केला जातो, तेंव्हा श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण शैक्षणिक  आणि स्वच्छता कशा विविध क्षेत्रात तनमनधनाने काम करून सेवेचं व्रत स्वीकारलेले प्राथमिक शिक्षक, पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजभूषण पुरस्कार,तसेच करकंब गावच्या नुतन डी.वाय.एस.पी.पदावर निवड झालेल्या गीतांजली टकले यांना कै.पंढरीनाथ आण्णा दुधाणे स्मृती पुरस्कार आणि कै.गोरख तात्या इदाते  स्मृती पुरस्कार भागवताचार्य राणीताई सिदवाडकर यांची निवड करण्यात आली असून पुढील कार्यासाठी श्री चौंडेश्वरी मातेचा आशिर्वाद आणि प्रेरणा घेऊन उत्साहाने काम करण्यासाठी गती मिळणार आहे,वितरण सोहळा  रविवार दिनांक २२जानेवारी सायंकाळी ४:००वा.शाकंभरी गार्डन येथे डाइटचे प्राचार्य आणि व्याख्याते डॉ.संदीपजी वाघचौरे (संगमनेर) अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत आणि सदस्य यांच्या शुभहस्ते उपस्थितीत देण्यात येणार असून या दिवशी तिळगूळ वाटप,आणि महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि व्याख्यान होणार  असून सर्व करकंबकर ग्रामस्थांनी व कोष्टी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने करण्यात आले आहे.