Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साधू होण्यासाठी साधूचा वेश धारण करन गरजेचं नसून चांगले कर्म आवश्यक,:-चारुदत्तबुवा आफळे

साधू होण्यासाठी साधूचा वेश धारण करन गरजेचं नसून चांगले कर्म आवश्यक : चारुदत्तबुवा आफळे करकंब श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब ...साधू होण्यासाठी साधूचा वेश धारण करन गरजेचं नसून चांगले कर्म आवश्यक : चारुदत्तबुवा आफळे

करकंब श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रवणीय नारदीय कीर्तन महोत्सवात चारुदत्त आफळे बुवा यांनी सांगितले.

सुरुवातीला चारुदत्त बुवा आफळे, अध्यक्ष मिलिंद उकरंडे विजय भागवत संतोष पिंपळे, राजू अनवते,श्रीकांत आरोळे, विश्वास जोशी, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते पूजन व दीपप्रज्वलन करून कीर्तनाला प्रारंभ झाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करताना सांगितले की समाजातील अनेक व्याधींनी,अडचणींनी गरीब लोक ग्रस्त आहेत अशा लोकांची सेवा करत हेच खरं संताच लक्षण असून आपण आपल्या घरातील व्यक्तिवर प्रेम करतो तेवढच प्रेम समाजातील प्रत्येक व्यक्तिंनी करता आलं पाहिजे, सध्याच्या काळात न्याय मिळायला अनेक वर्ष लागतो,न्यायाला विलंब हा सुद्धा एक अन्यायच आहे, शिवाजी महाराजांच्या काळात लगेच निर्णय घेऊन गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला जात होता,नामान आपली दैवी शक्ती जागृत होते, स्वधर्म प्रत्येक व्यक्तिंनी पाळला पाहिजे,स्वधर्माची प्रतिष्ठा प्रत्येकांनी राखली पाहिजे,त्यालाच स्वराज्य म्हणाव,आणि ह्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर तरुण पिढी सज्ज असली पाहिजे,सामर्थ्याची उपासना आणि उपासनेच सामर्थ्य फार गरजेचं अस सांगून उत्तरंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आफजलखान भेट यांचं सुंदर आख्यान सांगताना शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे अफजलखानाला ठार केले, यासाठी महाराजांचे विचार,पोवाडे, अतिशय सुंदर पद्धतीने सांगून लोकांनी ऐतिहासिक चरीत्र,संत चरित्र, क्रांतिकारक चरीत्र ऐकली पाहिजेत सांगून करकंब करांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते पखवाज शिवराज पंडीत टाळ माऊली पिसे यांनी केली यावेळी अनेक तरुण युवक युवतींनी उपस्थित राहुन कीर्तनाचा आनंद घेतला, महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री कोष्टी समाज बांधव अधिक परिश्रम घेत आहेत.