Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

हरिनामाने काळाची भिती नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते:-संदीपबुवा मांडके श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब वतीने महिलांच्या सुप्त गुणांना वाव

हरिनामाने काळाची भिती नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते:-संदीपबुवा मांडके श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब वतीने महिलांच्या सुप्त गु...





हरिनामाने काळाची भिती नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते:-संदीपबुवा मांडके





श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब वतीने महिलांच्या सुप्त गुणांना वाव

करकंब:-श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय कीर्तन महोत्सवात आज तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प संदीप बुवा मांडके यांनी गुंफले, सुरुवातीला संदीप बुवा मांडके अध्यक्ष मिलिंद उकरंडे,विजय भागवत संतोष बुगडी,नामदेव माळी,अरुण वास्ते,संतोष पिंपळे संतोष टकले ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कीर्तनाला सुरुवात झाली, कृष्णभक्त कृष्ण दयार्णव स्विमींच्या नारायण भज रे तू नारायण भज या अभंगावर सुंदर निरुपण करताना सांगितले मनुष्य जन्म घेताना काहीही ज्ञान नसते परंतू तो आई-वडील यांच्या संस्कारानेच ज्ञानी बनतो, तेंव्हा जीवन जगत असताना काम करत करत प्रभूच नाम घेतले तर कोणत्याही संकटातून सही सलामत सुटतो,पण त्याला अनन्य भावाने शरण आले पाहिजे,मानाने देवाला भजावे,अखंड नामस्मरण केले असता काळाची भिंती राहत नाही,चित्त नाही नाही तरी ते व्यर्थच.देव वैकुंठात नसून जेथे जेथे भगवंताच नाम गायन चालूच तेथे तो असतो. रिभजनाने त्रिवीध ताप नष्ट होतात,असं सांगत पूर्वरंगानंतर उत्तररंगामध्ये द्रोपदी ही आदी शक्ती रुपात कशी अवतरते म्याच ज्ञान भीमाला श्रीकृष्ण कसे करुन देतात यांचे सुंदर दाखले देऊन करकंब कर कला रसिकांना मंत्रमुग्ध केले,याचबरोबर अनेक अभंग हरि भजनात विन काळ,साथ देतील हिम शिखरे, शंभो शंकरा,द्रुत तराणा,अमृताहूनी गोड नाम तुझे देवा,आदी अभंग, नाट्यसंगीत,साकी, दिंडी,कटाव गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच अप्रतिम दमदार साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वैभव केंगार पखवाज ओंकार व्यवहारे टाळ माऊली पिसे यांनी अतिशय सुंदर केली,अडीच तास चाललेल्या या नारदीय कीर्तनान एक भाविक जागेवरून उठून गेला नाही इतकं तल्लीन होऊन गेले होते रसिक एक सुंदर कीर्तन ऐकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, दुपारी महिलांच्या वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या चौंडेश्वरी ट्रस्ट ने विविध वेशभूषेने महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करूनदिले असून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचा करकंब महिलांना अभिमान वाटतो महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे विजय भागवत,मोहन बोधे,विशाल बोधे, कांतीलाल टकले,आदी समाजबांधव अधिक परिश्रम घेत आहेत ७तारखेपर्यत चालणाऱ्या या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने करण्यात आले आहे.

फोटो कौशल्य:-साई डिजिटल रुपेश सदावर्ते करकंब