Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर व पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी ग्राहक प्रबोधन मेळावा संपन्न

अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर व पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी ग्राहक प्रबोधन ...

अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर व पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी ग्राहक प्रबोधन मेळावा संपन्न 

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे जिल्हा सदस्य श्री.अण्णा ऐतवाडकर हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पंढरपूर मर्चंट  बँकेचे व्यवस्थापक श्री.अतुल म्हमाने हे होते.

      याप्रसंगी बोलताना तालुका सचिव प्रा.धनंजय पंधे यांनी ग्राहक व बँकेचे व्यवहार यांच्यातील सुव्यवस्थेबाबत तसेच ग्राहक कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

श्री.संभाजी लंगोटे मध्यस्थ, जिल्हा न्यायालय सोलापूर यांनी ग्राहकांच्या तक्रारी व त्यातील मध्यस्थता याविषयीची भूमिका मांडली.

श्री.सुनील यारगट्टीकर तालुका सदस्य ग्राहक पंचायत यांनी ग्राहक म्हणून आपली जबाबदारी व हक्क याबाबत मार्गदर्शन केले.

बँकेचे व्यवस्थापक श्री.अतुल म्हमाने यांनी आपल्या भाषणात आँनलाईन बँकिंग व्यवहार व होणारी फसवणूक याबाबत अनुभव सांगितले.

अध्यक्षीय भाषणात श्री.अण्णा ऐतवाडकर यांनी ग्राहक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व त्याबाबत सोडवण्यात आलेले विषय यावर माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक श्री.महेश भोसले यांनी केले.तर,आभार प्रदर्शन श्री.पांडुरंग अल्लापूरकर जिल्हा सदस्य ग्राहक पंचायत यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत चे तालुका कोषाध्यक्ष श्री.तेजस फडे तसेच पंढरपूर मर्चंट बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.