Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

राजस्थान येथील राष्ट्रीय स्काऊट गाईड स्पर्धेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूलच्या अठरा विद्यार्थ्यांची निवड

राजस्थान येथील राष्ट्रीय स्काऊट गाईड स्पर्धेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूलच्या अठरा विद्यार्थ्यांची निवड करकंब  भारत स्काऊट व गाईड नवी दिल्ली य...


राजस्थान येथील राष्ट्रीय स्काऊट गाईड स्पर्धेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूलच्या अठरा विद्यार्थ्यांची निवड

करकंब 

भारत स्काऊट व गाईड नवी दिल्ली यांच्या वतीने दर 4 वर्षांनी स्काऊट गाईड राष्ट्रीय (जांबौरी) स्पर्धा होत असतात, यावर्षी( पाली) राजस्थान येथे दिनांक 04/01/ 2023 रोजी पासून भारत स्काऊट गाईड (जांबौरी) स्पर्धा सुरू होत आहेत देशपातळीवर होत असलेल्या या स्पर्धेचे उदघाटन आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते होणार आहे, या स्काऊट गाईड जांभोरी मध्ये संपूर्ण भारतातून 3,500 विद्यार्थी सहभाग घेणार आहेत, सदर राष्ट्रीय (जांबौरीस) महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना, रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब, तालुका पंढरपूर चे 18 विद्यार्थी व 02 शिक्षक(स्काऊट मास्टर श्री एम के पुजारी सर व स्काऊट लीडर श्री हेमंत कदम सर) प्रतिनिधित्व करणार आहेत ही एक करकंब -करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या स्पर्धेसाठी 

1)रोहन अशोक कुंभार 

2)अथर्व विलास शिंदे 

3)रुद्र रविंद्र गुजरे 

4)कार्तिक मनोज पवार 

5)अलंकार दिपक सुतार 

6)कुणाल सुनिल मोहिते 

7)रोहित अमोल शिंगटे 

8)विवेकानंद दत्तात्रय लोकरे

9)शिवरत्न दत्तात्रय कुंभार 

 10)ज्ञानेश्वर अरूण कुंभार 

11)सुमित मोहन शिंगटे 

12)आदर्श नितीन शेटे 

13)सोहम सत्यवान व्यवहारे

14)शंभूराजे दिलीप व्यवहारे

15)विक्रम सुनिल जगताप 

16)जयराम दत्तात्रय लोकरे

17)शंकर गोरख वसेकर

18)अजय भारत नलवडे



यांची निवड झालेली असून सदर विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर एम के पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थांचे दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर चे स्थानिय सचिव महेश चौप्रा, प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे , प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे , शालेय शैक्षणिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.