Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

कै.नागन्नाथ भानुदास दुधाणे यांच्या सावडाच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमी परिसर केला चकाचक सतिश दुधाणे आणि रमेश दुधाणे परिवार नातेवाईक, करकंब ग्रामस्थ जागर टीमच सहकार्याने स्तुत्य उपक्रम

कै.नागन्नाथ भानुदास दुधाणे यांच्या सावडाच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमी परिसर केला चकाचक सतिश दुधाणे आणि रमेश दुधाणे परिवार  नातेवाईक, करकंब ग...
कै.नागन्नाथ भानुदास दुधाणे यांच्या सावडाच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमी परिसर केला चकाचक

सतिश दुधाणे आणि रमेश दुधाणे परिवार  नातेवाईक, करकंब ग्रामस्थ जागर टीमच सहकार्याने स्तुत्य उपक्रम

करकंब: कै.नागन्नाथ भानुदास दुधाणे यांच ३० डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले‌ आज तिसरा सावडायचा दिवस तेंव्हा जागर टीमच्या वतीने दुधाणे कुटुंबाला उपक्रमाविषयी सांगून राबवण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी होकार दिला,जागर टीमच्या स्वच्छता दुतांनी सर्व स्वच्छता साहित्य आणून दुधाणे परिवार, नातेवाईक,आणि करकंब ग्रामस्थांच्या सहकार्याने बघता बघता हजारो हातांनी करकंब स्मशानभूमी परिसर चकाचक‌‌‌ केला,आपण जन्म घेतो आणि आपला शेवटचा मुक्काम स्मशानभूमीतच त्यामुळे ही स्मशानभूमी सुद्धा स्वच्छ आणि सुंदर असलीच पाहिजे.जागर टीमच्या वतीनेही नियमितपणे ही स्वच्छता करण्यात येते, अतिशय स्तुत्य असा उपक्रम प्रत्येकांनी राबवला पाहिजे, स्मशानभूमीत काही लोक शौचालयास बसत असलेले दिसले, रस्त्यावर कचरा टाकू नये घंटागाडीचा वापर करावा,आणि आपले करकंब गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचलावा,या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.