Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

महिलांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक...

पंढरपूर: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक पंधरवड्या अंतर्गत, पंचायत समिती आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पंढरपूर यांच्या संयुक्त वि...पंढरपूर: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक पंधरवड्या अंतर्गत, पंचायत समिती आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांच्या महिलांचे प्रबोधन आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी आपले विचार व्यक्त केले. पंढरपूरचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रशांत काळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गजानन सुतार,तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री अण्णा ऐतवाडकर यांनी केले. यावेळी संघटनेची स्थापना व कार्यपद्धती स्पष्ट केली.

जिल्हा संघटक श्री दीपक इरकल यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.महिलांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असेही प्रतिपादन केले. बचत गटांनी आर्थिक सक्षम होतानाच,ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करून, त्यांना येणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करावी असे आवाहन केले. यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदैव सहकार्य करेल असेही आश्वासन दिले.जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर यांनी विविध उदाहरणांद्वारे ग्राहकांचे संरक्षण कसे करता येईल हे स्पष्ट केले. तालुका सदस्य सुनील यरगट्टीकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी तालुका सदस्य श्रीराम साळुंखे, तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी  ,समाधान खूपसे,तालुका व्यवस्थापक,देवल परचंडे,प्रभाग समन्वयक,गणेश गुरव, प्रभाग समन्वयक,वैभव चव्हाण,प्रभाग समन्वयक,अभिजीत अंगरखे,प्रभाग समन्वयक,अण्णासाहेब आवताडे, दीपक कदम, आकाश पवार, महिला प्रतिनिधी,कल्पना शेवाळे, प्रभाग व्यवस्थापक,विजया गायकवाड,प्रीतम जाधव, प्रभाग व्यवस्थापक यांनी सहकार्य केले.