Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सुदामा सारख्या मित्राची जाणीव ठेवणारा एकतरी श्रीकृष्णा सारखा सच्च्या मित्र मनुष्याने जीवनात करावा करकंब ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारी राजधानी :-धनश्री नामदास दुधाणे परिवाराच्या वतीने आयोजित भागवत कथेची उत्साहात सांगता

  करकंब : कै.पुष्पा नारायण दुधाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने व नारायण पंढरीनाथ दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल...

 

करकंब : कै.पुष्पा नारायण दुधाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने व नारायण पंढरीनाथ दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रीमत् ग्रंथराज भागवत कथेची आज करकंब नगरी मध्ये उत्साहात सांगता झाली.

राणीताई सिदवाडकर यांच्या रसाळ वाणीतून गेले सात दिवस श्रीमत् भागवत कथेच आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला.नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प.एकनाथ महाराज नामदास, धनश्री नामदास, करकंब पोलीस स्टेशनचे एक.पी.आय.निलेशजी तारु साहेब,धनंजय इदाते, मिलिंद उकरंडे,विजय भागवत, कैलास वसेकर,विजय जाधव,ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली,त्यानंतर मनोगतात एकनाथ महाराज यांनी भागवत कथेचे आयोजन करण म्हणजे मोठी पुण्याच काम असून ते आई-वडील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुधाणे परिवार करीत आहेत‌.संत नामदेवांनी आयुष्यभर वारकरी सांप्रदायाची पताका भारत देशात फडकवली,आणि नामस्मरणाचा प्रचार प्रसार केला,तसाच आपण आयुष्यात भगवंताची नाम धारण करुन आयुष्य आनंदमय सुखमय कराव सांगत आकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा,सांगत आशिर्वाद दिला,आणि धनश्री ताई नामदास यांनीही करकंब गाव सांस्कृतिक सामाजिक पर्यावरण स्वच्छता आणि आध्यात्मिक वारसा जपत असून एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख निर्माण केली असून भागवत कथेचे श्रवणाचे महत्व सांगितले, निलेश तारु साहेब यांनी सुंदर अशा सुरु असलेल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.आणि कथेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सन्मान दुधाणे परिवाराच्या वतीने करण्यात येऊन कथेला प्रारंभ झाला,सांगतेच्या वेळी राणीताई सिदवाडकर यांनी सांगितले की भागवत कथा मनुष्याला कसं मरावं हे शिकवत,मरणाची भिती घालवत आणि हेच खरं आयुष्यातील जगण्याचं सारं आहे सांगून मनुष्याने जीवनात मित्र करावेत की ते आपल्या संकटकाळी एकमेकांच्या मदतीला धावून येतील,जसा श्रीकृष्ण आपला मित्र सुदाम यांच्या आयुष्याच सोनं केलं,आयुष्यात माणसाने पैशापेक्षा माणुसकीला महत्व द्याव,माणुसकी हाच खरा जीवनाचा खरा धर्म आहे,अशी अनेक उदाहरणे देत रसाळ वाणीतून सर्व करकंबकरांना मंत्रमुग्ध केले,यावेळी राहुल शिलवंत, विशाल बोधे यांच्या श्रीकृष्ण सुदामा भेट संजीव देखावा सादर करुन डोळ्याचं पारण‌ फेडले,या कथेला नामदेव आघाव ज्ञानेश्वर रहाटे रमेश वीटे ज्ञानेश्वर पिसे यांनी अतिशय सुंदर साथसंगत करुन कथेला स्वरसाज चढवला,प्रत्येक रसिकांच्या चेहऱ्यावर भागवत कथा ऐकल्याचा समाधानाचा भाव दिसत होता,पुढील वर्षी द्वितीय पुण्यस्मरणा निमित्ताने राम कथेच आयोजन करण्यात येणार अस ज्ञानेश्वर दुधाणे यांनी जाहीर केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान,जागर टीम,लेकीच झाड टीम,तसेच चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टने तसेच विजय भागवत, मिलिंद उकरंडे, विजय जाधव,मोहन बोधे, जोतीराम सिदवाडकर,संतोष बुगड,आलेकर बंधू,लक्ष्मण कवडे, सचिन घाडगे, रमेश सचिन मुजमुले,रुपेश सदावर्ते,टकले परिवार,सर्वच करकंबकर रसिकांनी सहकार्य आणि परिश्रम घेत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता उत्साहात साजरी केली

फोटो सौजन्य साई डिजिटल रुपेश सदावर्ते