Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ईश्वर घोरपडे यांच्या दमदार आणि श्रवणीय गायनाने करकंबकर रसिक मंत्रमुग्ध

श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब मध्ये महाराष्ट्रात...





श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब



प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब मध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ईश्वर घोरपडे यांचे गायन आयोजित करण्यात आले होते.



सुरुवातीला ईश्वर घोरपडे आशय कुलकर्णी बाळासाहेब वास्ते,माऊली पिसे,आप्पा मोहिते, महादेव भाजिभाकरे कांतीलाल टकले यांच्या शुभहस्ते पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.


सुरुवातीलाच जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार या पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली अभंगरचना गाऊन तल्लीन करत पूर्ण अभंगवाणी अभिषेकी बुवांनीच स्वरबद्ध केलेले अभंग आणि नाट्यगीत गायली.त्यामध्ये काटा रुते कुणाला, अमृताची फळे,अबीर गुलाल उधळीत रंग,आम्हां न कळे ज्ञान,सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी,लागला वेणूचा छंद,असे एकापेक्षा एक सरस अभंग गात कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, स्वामी  कृपा कधी करणार या भैरवी ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, मध्यांतरात पद्मश्री तालयोगी सुरेशदादा तळवलकर यांचे शिष्य आशय कुलकर्णी यांनी स्वतंत्र तबलावादन करुन अभिजात शास्त्रीय संगीताची अप्रतिम झलक दाखवली, रसिकांनी ही तेवढीच सुंदर दाद दिली,आणि पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वैभव केंगार टाळ शिवराज पंडीत यांनी अप्रतिम केली,सर्व उपस्थित कला रसिकांनी सुंदर दाद दिली.अतिशय सुंदर कार्यक्रम ऐकल्याचा भाव प्रत्येक रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता, कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत करकंब मध्ये शास्त्रीय संगीताचा सांस्कृतिक वारसा पुढं चालवण्यासाठी लहान मुलामुलींनी गायन वादन शिकण्याचे आवाहन केले,रविवारी पहाटे श्री महाराजांच्या चरणी पुष्पवृष्टी होणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज चैतन्य जप संकुलाच्या वतीने करण्यात येत आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जपकार रामनाम प्रेमी अधिक परिश्रम घेत आहेत.