Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

लक्ष्मी टाकळी येथे ग्राहक प्रबोधन मेळावा व ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूर: अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा सोलापूरच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागरण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. अ...

पंढरपूर: अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा सोलापूरच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागरण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी दिली आहे.

यामध्ये दिनांक 15 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध कार्यक्रम,उपक्रम,स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.पंढरपुरातही विविध शासकीय कार्यालये तसेच नागरिकांसाठी जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्ताने सोलापुरे नगर,लक्ष्मी टाकळी,ता.पंढरपूर येथे शनिवार दिनांक 17/12/2022 रोजी सायंकाळी 6.30 वा. ग्राहक प्रबोधन मेळावा व जेष्ठ नागरिकांचा सन्मान अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास  ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळीच्या सरपंच सौ. विजयमाला वाळके उपसरपंच श्री संजय साठे ग्रा.पं. सदस्य श्री भैय्यासाहेब सोनवणे,सदस्या सौ.रेश्मा संजय साठे, माजी सरपंच सौ. नूतन रसाळे तसेच स्वानंद कला मंच व ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप टोमके उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी विठाई उद्योगसमूहाचे प्रमुख श्री महेशनाना साठे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहकोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते जिल्हा कार्यकारणी सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापुरकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लक्ष्मी टाकळीतील ग्राहक विषयक प्रश्न व जेष्ठ नागरिकांच्या मागण्यांची चर्चाही होणार आहे,तरी लक्ष्मी टाकळीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये व संघटक महेश भोसले यांनी केले आहे.