Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

हिंदू धर्म टिकवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र राहिले पाहिजे काळाची गरज:-डॉ.प्रज्ञा देशपांडे

श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होत असताना उत्सवामध्ये डॉ.सौ.प्रज्ञा देशपांडे यांनी...
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होत असताना उत्सवामध्ये डॉ.सौ.प्रज्ञा देशपांडे यांनी नारदीय कीर्तनातून आपले विचार व्यक्त केले.


सुरुवातीला चौंडेश्वरी मातेची आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या. प्रतिमेचे पूजन करुन कीर्तनाला सुरुवात झाली, पूर्वरंगामध्ये तोची म्हणावा जगी संत या अभंगावर निरुपण करताना सांगितले की संसार सागरातून तरुण जायचे असेल तर संतांची शिकवण आणि संगत अतिशय महत्वाचे असून सध्याच्या युगात आपला हिंदू धर्म टिकवण आणि आपल्या धर्माचे रक्षण करणं अतिशय आवश्यक असून यासाठी सर्वांनी द्वेष मत्सर विसरून एकदिलाने एकत्र मिळून कार्य केले पाहिजे तरच भविष्यकाळात आपला हिंदू धर्म टिकणार, स्वामी विवेकानंद हे सद्गुरू परमहंस यांच्या उपदेशाने नरेंद्रचे विवेकानंद झाले,संतांची राहणी साधी असली तरी आतून ते शांत झालेले असतात, सुखदुःख यांच्या पलीकडे वृत्ती स्थिर झालेली असते, त्याप्रमाणे आपण संसारात आपली वृत्ती स्थिर ठेवली पाहिजे, त्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेले नाम हेच एकमेव कल्याणकारी तत्व असलेलं दिसून येते आणि त्याच नामाच्या जोरावर संत सखुबाई परमपदाला कशी पोहचली याच उत्तरंगामध्ये अतिशय सुंदर आख्यान सांगताना संतांनी एकदा ठरवले की ठरवले मग तिथं  देह जावो अथवा राहो पांडूरंगी दृढ भावो या निश्चयाने संत सखुबाईचा सासरी अतोनात छळ असून सुद्धा विठूरायाच्या दर्शनासाठी आपल्या देहाची पर्वा केली नाही, प्रत्यक्ष पांडुरंग सखु होऊन घरी काम करत राहिला,देवाला दुसरं काही नकोय स्व पाहिजे बाकीचे सर्व काही आपण देतो परंतू स्व देत नाही, त्यामुळे आपला संसार आहे तसाच राहतो या सर्व संतांनी आपला देह परमार्थासाठी अर्पण केला, अतिशय सुंदर दृष्टांत देत सुंदर रचना गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते टाळ शिवराज पंडीत यांनी केली, दुसऱ्या दिवशी ख्यातनाम गायक ईश्वर घोरपडे यांची श्रवणीय अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जपसंकुल व रामनाम प्रेमी यांचे वतीने करण्यात येत आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय भागवत ज्ञानेश्वर दुधाणे महादेव दुधाणे दत्तात्रय इदाते,मोहन बोधे,कांतीलाल टकले,मोहन रसाळ, धनंजय इदाते, बाळासाहेब इदाते,संजीवकुमार म्हेत्रे, पल्लवी टकले,उषा पिसे,सुरेखा मस्के,आदी सर्व नामप्रेमी अधिक परिश्रम घेत आहेत.