Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

परराज्यातील कामगारांना मिळणार का मदत.

करकंब प्रतिनिधी. करकंबमध्ये दुर्दैवी घटनेत ऊस तोडणी  कामगार तीन  महिला व दोन बालकांचा मृत्यू झाला. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट...


करकंब प्रतिनिधी.

करकंबमध्ये दुर्दैवी घटनेत ऊस तोडणी  कामगार तीन  महिला व दोन बालकांचा मृत्यू झाला.


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट दोन च्या वतीने आर्थिक मदत त्या कुटुंबांना  मिळणार का?असे प्रश्न सर्वांच्या मनात येत आहेत. 

रात्री अकरा वाजता घटना घडल्यानंतर त्या परिसरातील नागरिक मदतीला धावून गेले मात्र ट्रॉलीचे  वजन जास्त असल्यामुळे व जेसीपी येण्यास विलंब लागल्यामुळे या घटनेतील महिलांचा मृत्यू झाला.मयत लहान मुलांना पाहुन लोकांच्या पोटात दुःखाने गोळा आला. बचाव कार्यात अनेकांनी मदत केली.

घटनास्थळी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशमुख ,पंढरपूरचे डी वाय एस पी विक्रम कदम, पोलीस स्टेशनचे एपीआय महेश मुंडे ,करकंब गावचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, ऍडव्होकेट शरदचंद्र पांढरे व सचिन शिंदे यांनी  घटनास्थळी भेट देऊन त्या जागेची पाहणी केली.

मयत कुटुंबांच्या वारसांना आर्थिक मदत मिळणार का? त्यासाठी कागदपत्र, इन्शुरन्स याबाबत सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक शिरीष सरदेशमुख यांनी ट्रॅक्टर मालकांची  विचारपूस केली व त्यांना सर्व कामगारांना सहकार्य करण्याच्या सूचना दिला. त्या घटनास्थळी विचारपूस केली. मदत कार्याला आलेल्या सर्वांना त्यांनी अशीच सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

गरीब,अज्ञान ,पोट भरण्यासाठी आलेला कुटुंबांना शासनाकडून जे काही मदत मिळण्यासाठी सर्व टीमने पोलीस स्टेशनचे कागदपत्राची पूर्तता व त्या नातेवाईकांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना शिरीष सरदेशमुख यांनी तपास अधिकारी एपीआय महेश मुंडे यांना दिली.टिचभर पोटासाठी एवढ्या लांबून  कामासाठी आलेल्या गरिबीने गांजलेल्या  कुटुंबांवर ही अतिशय दूर्दैवी वेळ आल्याबद्दल दुःख व्यक्त केले.