Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सद्गुरू गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त करकंब येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव दिनांक १२डिसेंबर ते१८डिसेंबर या दिवसांमध्ये विविध का...


करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव दिनांक १२डिसेंबर ते१८डिसेंबर या दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांनी चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ येथे साजरा होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जप संकुल करकंब यांचे वतीने करण्यात येत आहे.

या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५ ते ७ काकडाआरती अखंड दररोज १३तासाचा श्रीराम जय राम जयजय राम जपमाळ, सायंकाळी महिला मंडळाचे भजन,आरती होणार असून तसेच गुरुवार दिनांक १५ डिसेंबर रोजी ख्यातनाम कीर्तनकार डॉ प्रज्ञा देशपांडे यांचे श्रवणीय नारदीय कीर्तन शुक्रवार दिनांक १६डिसेंबर रोजी पं विजय कोपरकर यांचे शिष्य इश्वर घोरपडे यांची अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून साथसंगत आशय कुलकर्णी ज्ञानेश्वर दुधाणे वैभव केंगार,राम अनवते,शिवराज पंडीत,माऊली पिसे यांची असणार आहे,तसेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दिनांक १८डिसेंबर पहाटे ४वाजले पासून सुरु होणार असून गुलालाचे प्रवचन श्री सुर्याजी भोसले यांचे झालेनंतर ५:५५मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून दुपारी १२वा श्री व सौ. विद्या प्रभाकर वास्ते यांचे वतीने दुपारी १२वा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जप संकुल क्र.१सर्व रामनाम जपकार प्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.यासाठी विजय भागवत  ज्ञानेश्वर दुधाणे, महादेव दुधाणे, मिलिंद उकरंडे,दत्तात्रय इदाते,मोहन बोधे,मोहन रसाळ, संजीवकुमार म्हेत्रे, आलेकर बंधू धनंजय इदाते,संतोष बुगड, कांतीलाल टकले, पल्लवी टकले, शालन टकले,केशर टकले,दादा धोत्रे बाळकृष्ण इदाते, ज्ञानेश्वर पिसे महादेव भाजिभाकरे,चंदू टकले,आदी रामनाम प्रेमी परिश्रम घेत आहेत.