Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

मनोज लोहिया यांची करकंब पोलीस स्टेशनला भेट.

करकंब प्रतिनिधी  करकंब पोलीस स्टेशनच्या नूतन बांधलेल्या इमारतीची पोलीस महानिरीक्षक यांनी केली पाहणी. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज लोहिय...

करकंब प्रतिनिधी 

करकंब पोलीस स्टेशनच्या नूतन बांधलेल्या इमारतीची पोलीस महानिरीक्षक यांनी केली पाहणी.

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज लोहिया यांची करकंब पोलीस स्टेशनला भेट


करकंब : कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक श्री .मनोज लोहिया यांनी आज करकंब पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी साठी आले होते.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. मनोज लोहिया यांनी करकंब पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेऊन व करकंब येथे बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीची बांधकामाची सर्व बाबींची माहिती जाणून घेऊन पाहणी केली.

या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक -शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक-हिम्मतराव जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी-विक्रांत कदम, करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि-निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक-महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक-अजित मोरे आदिंसह कोल्हापूर परिक्षेत्र मधिल पोलीस अधिकारी व कार्यालय स्टॉप तसेच करकंब पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.