Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये दत्त जयंती भक्तीमय वातावरणात साजरी

करकंब प्रतिनिधी. करकम मध्ये आज गुरुपौर्णिमा निमित्त दत्त जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. सुवर्ण गार्डन, उजनी वसाहत, सो...


करकंब प्रतिनिधी.

करकम मध्ये आज गुरुपौर्णिमा निमित्त दत्त जयंती मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.

सुवर्ण गार्डन, उजनी वसाहत, सोमनाथ मंदिर, मध्यवर्ती परीट गल्ली येथील दत्त मंदिरात कीर्तन भजन व दत्ताचा पाळणा म्हणून दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद वाटप करण्यात आला.

श्री दत्ताला अभिषेक, पूजा महिला भगिनींनी श्री दत्ताचा पाळणा गाऊन दत्त जयंती साजरी केली.

मांजरे, दत्तात्रय तेली, भक्तांनी केळी व बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटला. भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सर्वत्र श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली.

श्री दत्त मंदिरात राजू देशपांडे व परिवाराने रुद्राभिषेक, भजन,धार्मिक कार्यक्रम करून साजरी करण्यात आली व  संध्याकाळी  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम विविध ठिकाणी संपन्न झाला.