Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे विविध समाज एकत्रित आणून ज्ञान... भक्तीचा ...भरला जनसागर.....! करकंब अखंड हरिनाम सप्ताहाची विठू ...नामाच्या जयघोषाने सांगता

करकंब प्रतिनिधी:-दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या करकंब हे अगदी खूप वर्षापासू...


करकंब प्रतिनिधी:-दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या करकंब हे अगदी खूप वर्षापासून ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, व सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेले गाव म्हणून सुपरिचित आहे. लोकसंख्येप्रमाणे या करकंब पुण्य नगरीमध्ये विविध जाती- धर्माचे लोक आजही गावात वास्तव्य करीत आहेत. अशा धार्मिक ऐतिहासिक, शैक्षणिक व इतर बाबतीत अग्रेसर असलेले या गावातील व परिसरातील विविध समाजातील जाती धर्मातील लोकांना एकत्रित आणून ज्ञान व भक्तीचा सहिष्णूचा जनसागर भरवल्याचे चित्र करकंब पुण्यनगरीमध्ये दिसून येत आहे .सालाबाद प्रमाणे याही वर्षी गीता जयंतीनिमित्त कै. सद्गुरु बजरंग (तात्या) पिसे महाराज यांच्या   कृपाशीर्वादाने समस्त करकंब ग्रामस्थांच्या सहकार्याने ह भ प श्रीकांत महाराज आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब( कसबा पेठ) येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर येथे मोठ्या उत्साहात धार्मिक भक्ती भावाने  मार्गशीर्ष शुद्ध 6- मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पासून धार्मिक सोहळा सुरू आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह मार्गशीर्ष शुद्ध 6 - मंगळवार दिनांक-29नोव्हेंबर पासून ते  मार्गशीर्ष शुद्ध14- मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी संपन्न झाला.


या अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक सोहळ्याचे दहावे वर्ष असून या सोहळ्यात पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात श्री अभिषेक, सात ते आठ विष्णुसहस्रनाम, आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण, बारा ते एक भोजन, दुपारी एक ते तीन भजन, दुपारी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, संध्याकाळी सातला ते नऊ कीर्तन व त्यानंतर भोजन असून या धार्मिक सोहळ्यात गणेश महाराज बेलकर. पारनेर, अंकुश महाराज  रणखांबे. गिरवी, मोहन महाराज बेलापूरकर.पंढरपूर, भागवत महाराज शिरवळकर. पंढरपूर, विश्वंभर महाराज कदम. रोपळे, महादेव महाराज कानडे. पट्टी वडगाव, अनिरुद्ध महाराज निंबाळकर.  बिटरगाव, यांचे कीर्तन बरोबरच महाराज लिमगिरि. तुळशी, नवनाथ महाराज जळवली,भारत महाराज थोरात .करकंब, विजय महाराज गुरव . उंबरे, शंकर महाराज गोसावी. नेमतवाडी, चारुदत्त महाराज देशपांडे.

 भोसे,तुळशीदास महाराज गायकवाड. पेहे, यांचा प्रवचनाचा धार्मिक कार्यक्रम तर गीता जयंतीनिमित्त रविवार चार डिसेंबर रोजी सकाळी - दहा ते बारा गीता पाठ मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सात ते नऊ दिंडी नगर प्रदक्षिणा होईल.दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा ह भ प श्रीकांत महाराज आरोळे यांचे काल्याचे कीर्तनानंतर माजी पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.  व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे वाटप करून हा धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक सोहळ्यासाठी मिलिंद ‌देशपांडे, संतोष लोंढे, त्रिवेणी संगम, विठ्ठल शिंदे ,परमेश्वर शिंदे, अभिमान शेळके, सुनील जगताप, सुरेश बाबर, सोमनाथ गुंड , किरण गुरव, औदुंबर खडके, महादेव देशमुख, लक्ष्मण जाधव, राजाराम गाडे, विठ्ठल हराळे, रामचंद्र कवडे, भारत आरकस, नागनाथ खाडे, नारायण व्यवहारे, शंकर डोळे, झाकीर शेख ,समाधान माळी, भारत धायगुडे, महादेव खपाले,कै. कृष्णात खपाले स्मरणार्थ, सुखदेव खपाले, सतीश देशमुख ,राजेंद्र शेटे, सुनील जाधव, कै. गोरोबा चव्हाण स्मारणार्थ, यांचे बरोबरच कैलासवासी रामचंद्र आरकस यांचे स्मरणार्थ विक्रांतआरकस यांच्यातर्फे मोफत सात दिवस चहाची व्यवस्था, तसेच विजय शेटे यांच्याकडून पूर्ण सप्ताहात पाण्याची व्यवस्था, धोंडीराम काशीद व तानाजी काशीद (जयवंत भारत पेट्रोलियम), वैजिनाथ राऊत जळवली, सांगवी ,तुळशी, पेहे, भोसे, पांढरेवाडी ,घोटी, नेमतवाडी, गुरसाळे ,बार्डी ,जाधव वाडी, व परिसरातील सर्व टाळकरी आणि श्री विठ्ठल मंदिर विश्वस्त, सप्ताह समिती, भक्त, गावातील सर्व भक्त मंडळ, समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे उत्साहात धार्मिक व भक्ती भावाने साजरा करीत आहेत.या धार्मिक सोहळा कार्यक्रमास करकंबसह पंचक्रोशीतील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.