Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ख्यातनाम गायिका आरतीताई अंकलीकर आणि पं संजीव अभ्यंकर यांच्या स्वरांभिषेकांनी अश्वमेध संगीत महोत्सवाची सांगता

अश्वमेध संगीत महोत्सवाला आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती आज श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अश्वमेध फाऊंडेशन यांच्या ...

अश्वमेध संगीत महोत्सवाला आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती

आज श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अश्वमेध फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांना समर्पित दुसऱ्या दिवसाचे अश्वमेध संगीत महोत्सवाचे उद्घाटन पं. संजीव अभ्यंकर पं.शौनक अभिषेकी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संजीव ब्रह्मे, अश्वमेध फाऊंडेशन चे अध्यक्ष मयुरजी जोशी,उत्तम जोशी, डॉ अश्विनी बापट, अरविंद जोशी,भरत अनिखिंडी,निशिकांत महांकाळ,शांतनू खेडेकर,तनय दांडेकर,उदय पाळणीटकर, श्रीनिवास जोशी,प्रसाद दाते,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.त्यानंतर मान्यवर कलाकारांचा सत्कार करण्यात आला मयुरजी जोशी यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली पं संजीव अभ्यंकर यांनी सुरुवातीला राग हंसध्वनी रागात बडा ख्याल रुपक मध्ये सादर केला त्यानंतर त्याला जोडून बंदिश सादर करुन होती सादर करून रसिकांची मने जिंकली त्यानंतर ख्यातनाम गायिका आरतीताई अंकलीकर यांनी राग दुर्गा सादर केला.त्याला जोडून बंदिश व बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ही किशोरीताई आमोणकर यांनी स्वरबद्ध केलेली रचना सादर करुन भक्तीमय वातावरण तयार करुन नंतर अनेक संतांच्या रचना माझे चित्त तुझे पाणी,सावळा नंदाचा नंदन,आदी रचना गाऊन शेवटी अवघा रंग एक झाला आणि आता कोठे धावे मन या एकाच वेळी दोन्ही अभंगरचना भैरवीत संगीत महोत्सवाची सांगता केली यांना अप्रतिम आणि तितकीच दमदार साथसंगत तबला अजिंक्य जोशी हार्मोनियम अभिनय रवंदे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तालवाद्य अपूर्व द्रविड सुंदर निवेदन हेमंत बर्वे तर स्वर धनंजय मिसकर पांचाळ यांनी केली,यावेळी ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी अश्वमेध फाऊंडेशन व श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे सर्व‌ कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.