Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आनंदी जीवन व दीर्घायुष्यासाठी योगा अत्यावश्यक:- ननवरे करकंब रोटरी क्लबच्या वतीने 'राष्ट्रशिल्प पुरस्कार ' प्रदान

करकंब:- प्रत्येक माणसाला आपले जीवन सुखी, आनंदी व दीर्घायुष्यी बनवायचे असेल तर, योगाभ्यास करुन तो अंमलात आणण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्...

करकंब:- प्रत्येक माणसाला आपले जीवन सुखी, आनंदी व दीर्घायुष्यी बनवायचे असेल तर, योगाभ्यास करुन तो अंमलात आणण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन योगा पंडीत अशोक ननवरे यांनी केले.


 करकंब रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रशिल्प पुरस्कार ' वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ' मानवी जीवन फारच धकाधकीचे झाले असले तरी काही ठराविक वेळ योगासनांसाठी देणे गरजेचे आहे. पूर्वी उठल्यापासून झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागत असत त्यामुळे आपोआपच शरीरांची हालचाल होऊन व्यायाम होत असे. परंतु सध्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने अशी कामे कमी झाली. जेवणात ही पूर्वीसारखे कसदार पदार्थ, निरोगी भाज्यांचे प्रमाण कमी झाले. वेगवेगळी आसने, प्राणायाम, सुदर्शन क्रिया इत्यादी बाबत त्यांनी माहिती देऊन एखादे शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

 करकंब रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रघुनाथजी जाधव यांनी योगा, व्यायाम, दररोज चालणे याचे फायदे कसे होतात हे सांगून 'राष्ट्रशिल्प पुरस्कार' मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला. रोटरी ही श्रीमंतांची असली तरी गरीबांसाठी व समाजोपयोगी काम करणारी संस्था आहे.

 यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रा. किसन महादेव सलगर, शरद बीरादार, सुप्रिया शिंदे, आप्पासाहेब माळी, फैय्याज इनामदार यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे अशोक ननवरे, करकंब रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रघुनाथ जी. जाधव, संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांतकुमार मोरे, रोटरीचे सचिव डॉ. अक्षय मोरे, सौ. ननवरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

 तसेच या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष धनंजय इदाते, विकास शहा , डॉ. विनोद शिंगटे, सुनील अडगळे, लक्ष्मण जाधव, आदर्श प्रशालेच्या प्राचार्या विजया उंडे, न्यू इंग्लिश स्कूलचे संजीवकुमार म्हेत्रे, गगनगिरी विद्यालयाचे भोसले सर, दत्तात्रय खंदारे, पत्रकार सचिन शिंदे, भीमा व्यवहारे, मनिषा नितीन शेटे इत्यादी सह अनेक शिक्षक , पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. एम. जाधव यांनी तर आभार सुनिल अडगळे यांनी मानले.


पुढील शिक्षकांना 'राष्ट्रशिल्प पुरस्कार' प्रदान करण्यात आले.

सदाशिव बनकर (श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा, रा. बार्डी) , किसन सलगर (अभिछाया प्रतिष्ठान, सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करकंब), शिवाजी कदम (गगनगिरी विद्यालय सांगवी), संजय पाटील (रामभाऊ जोशी हायस्कूल), सुप्रिया शिंदे (आदर्श प्रशाला व ज्यु. काॅलेज), रमेश म्हेत्रे (न्यू इंग्लिश स्कूल), आप्पासाहेब माळी (जि. प. प्रा. मुलींची शाळा नं. १ करकंब), फैय्याज इनामदार ( जि. प. जानकर वस्ती ), आदिनाथ ढेकळे (गगनगिरी विद्यालय, सांगवी), शरदराव बीरादर ( जि. प. प्राथमिक शाळा नेमतवाडी), शितल खामकर-फासे ( जि. प. प्राथमिक शाळा पाटील वस्ती, सांगवी), सुनिता व्यवहारे ( अंगणवाडी जवाहर वस्ती, करकंब)