Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

देवकी पंडित आणि पं.शौनक अभिषेकी यांच्या स्वरांभिषेकांनी ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

फोटोओळ- ख्यातनाम गायिका देवकी पंडित आणि पं शौनक अभिषेकी गायनाला साथसंगत प्रशांत पांडव ज्ञानेश्वर सोनवणे ज्ञानेश्वर दुधाणे आनंद टाकळकर आणि हे...

फोटोओळ- ख्यातनाम गायिका देवकी पंडित आणि पं शौनक अभिषेकी गायनाला साथसंगत प्रशांत पांडव ज्ञानेश्वर सोनवणे ज्ञानेश्वर दुधाणे आनंद टाकळकर आणि हेमंत बर्वे सत्यजीत बेडेकर,सुरस्मिता ढवाळकर

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अश्वमेध युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वमेध संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवसाचे स्वरपुष्प ख्यातनाम गायिका देवकीताई पंडित आणि पं.शौनक अभिषेकी यांनी गुंफले, सुरुवातीला कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे  ,सचिव डॉ. सौ.आश्विनी बापट,विश्वस्त अरविंद जोशीअश्वमेध फाऊंडेशन चे अध्यक्ष मयुरेश जोशी,शौनक अभिषेकी आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

त्यानंतर डॉ. आश्विनी बापट यांनी श्री कौपीनेश्वर न्यासाबद्दल ,कार्याबद्दल माहिती सांगितली व येणाऱ्या काही कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच २२ मार्च २०२३ गुढीपाडव्याच्या स्वागत। यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सुरुवातीला पं.शौनक अभिषेकी यांनी राग सरस्वती ताल रुपक मध्ये ख्याल गायन व त्याला जोडून बंदिश सादर केली,व नंतर देवकी ताई पंडीत यांनी राग गोरखकल्याण विलंबित एकतालामध्ये गाऊन पं जितेंद्र अभिषेकी यांनी रचलेली बंदीश सादर करुन निर्गुणी भजन सादर केल्यानंतर मध्यांतरात सर्व गायक वादक यांचा सत्कार करण्यात आला नंतर लागली करजवा कट्यार,घेई छंद,संतभार पंढरीत,अबीर गुलाल उधळीत रंग या देवकी ताईंनी गायलेल्या अभंगाने रसिकांना मंत्रमुग्ध करत वन्समोअर घेत शेवटी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ने कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तितकीच सुंदर तबला प्रशांत पांडव हार्मोनियम ज्ञानेश्वर सोनवणे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ आनंद टाकळकर निवेदन हेमंत बर्वे स्वर सत्यजीत बेडेकर सुरस्मिता ढवाळकर साथसंगत केली,
या कार्यक्रमाला नगरसेवक मिलिंद पाटणकर,सौ पेंडसे,प्रतिभा मडवी, महाराष्ट्र भाजपा सचिव संदीप लेले, डॉ विजय जोशी (पद्मविभूषण बरोबरीचे मानकरी ठाणेकर)सौ.जोशी, डॉ विजय बेडेकर,सौ.बेडेकर,सौ.निलिमा सुहास मेहता (smc)पितांबरी उद्योग समूहाचे श्री दामले यांचेबरोबर ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वरांचा आनंद लुटला, रविवारी दुसरं पुष्प स्वरमार्तंड पं जसराज यांचे जेष्ठ शिष्य संजीव अभ्यंकर व ख्यातनाम गायिका आरतीताई अंकलीकर गुंफणार असून याही कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अश्वमेध फाऊंडेशन यांचे वतीने करण्यात येत आहे*