Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

संतानी समाज्याच्या हितासाठीच आपलं आयुष्य समर्पित केले:-सुर्याजी भोसले श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणामध्ये करकंबकर भक्तभाविक  मोठ्या संख्येन...


संतानी समाज्याच्या हितासाठीच आपलं आयुष्य समर्पित केले:-सुर्याजी भोसलेश्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणामध्ये करकंबकर भक्तभाविक  मोठ्या संख्येने उपस्थितकरकंब:-प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव करकंब येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला,सात दिवस अखंड श्रीराम जय राम जय जय राम जपमाळ,कीर्तन, अभंगवाणी असे कार्यक्रम करत आज पुण्यतिथी दिवशी  पहाटे ४:००वाजले पासून "श्री महाराजांच्या मुर्ती वर अभिषेक,काकडारती, करण्यात आली,त्यानंतर ह.भ.प.सुर्याजी भोसले यांच प्रवचन संपन्न झाले त्यामध्ये सांगताना म्हणाले की संत हे समाजाच्या हितासाठी जन्माला आलेले असतात,ते एका समाजापूरते,गावापूरते मर्यादित नसून हे विश्वची माझे घर या प्रमाणे समाजातील दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि मानवामध्ये समता,बंधूभाव,नांदावी यासाठी जन्माला येत असतात, आणि या कलीयुगात नामस्मरणाची कास धरावी अशी भावना संतांची असते, संसार करीत असताना प्रपंच म्हटला की अनेक सुखदुःख येतच राहतातच परंतू गुरुंच्या सहवासाने ती नाहीशीही होतात, गोंदवलेकर महाराजांना गुरुंच्या शोधात अनेक ठिकाणी फिराव लागलं शेवटी गुरु तुकामाईंनी अतिशय मोठ्या परीक्षा घेऊन महाराजांना शिष्य म्हणून स्वीकारले,आणि उध्दार करुन घेतला, त्याचप्रमाणे महाराजही सर्वांना सांगतात बाबांनो जेथे माझे नाम तेथे माझे प्राण,या भावनेनं सर्वांनी कर्म करीत नामस्मरण करत रहावे, सांगितले,त्यानंतर श्री महाराजांच्या चरणी पुष्पवृष्टी करण्यात आली,कापूर लावल्या नंतर आरती संपन्न झाली,त्यानंतर या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना महाराजांचा प्रसाद देऊन श्री महाराजांची पालखी नगरप्रदक्षिणा निघाली यामध्ये अनेक अबालवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले होते नामस्मरण करत करत पालखी चौंडेश्वरी मंदिरात आल्यानंतर फेर,फुगडी खेळून, दुपारी  समाप्ती वेळी आयुष बोधे या बालकांन अतिशय सुंदर नामदेवरायांची कथा सांगितली,आणि आरतीनंतर तसेच महाप्रसादाचे आयोजन सौ.विद्याताई व श्री बाळासाहेब वास्ते यांचे वतीने करण्यात आले होते,याचवेळी पुढील तीन वर्षांचे अन्नदात्यांनी आपले अन्नदान करणारं असल्याचे जाहीर केले, श्री महाराजांच्या उत्सवात काहीही कमी जाणवत नाही आजवरचा करकंबकर आयोजकांचा अनुभव आहे,हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विजय भागवत, ज्ञानेश्वर दुधाणे, दत्तात्रय इदाते,महादेव दुधाणे,मोहन बोधे,मोहन,रसाळ, माऊली पिसे,कांतीलाल टकले, नवनाथ कांबळे, दादा धोत्रे,बाळासाहेब इदाते,धनंजय इदाते, मिलिंद उकरंडे,संतोष बुगड, संजीवकुमार म्हेत्रे,सुरेखा मस्के, पल्लवी टकले,अमृता रसाळ,संध्या भागवत,सुधा टकले, शिवराज पंडीत,राम अनवते, महिला भजनी मंडळ,सर्व जपसंकुल नंबर १चे जपकार, रामनाम प्रेमी यांनी अधिक परिश्रम घेत सप्ताह यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.