Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन विविध उपक्रमांनी संपन्न

आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन विविध उपक्रमांनी संपन्न पंढरपूर: विद्या विकास मंडळच्या आपटे उपलप प्रशालेत, भ...
आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन विविध उपक्रमांनी संपन्न

पंढरपूर: विद्या विकास मंडळच्या आपटे उपलप प्रशालेत, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ज. वि. हरिदास सर, पर्यवेक्षक श्री द. पा धारूरकर सर ,श्री.जाधव सर, श्री. कुरे सर, श्री.गंगेकर सर,श्री. डाखोरे सर, श्री. राहुल भातलवंडे सर,   या सर्वांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक धारूरकर सर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली.श्री राहुल भातलवंडे सर यांनी वाचनाचे महत्व,मुलांच्या बुद्धिमत्तेचा  विकास  याबाबत मार्गदर्शन केले आणि वाचनाबद्दल जागृती निर्माण केली. हात धुवा दिनाच्या निमित्ताने हात धुण्याचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध लेखकांच्या गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन केले.