Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात साजरा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती ...जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात साजरा 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच हात धुवा दिनानिमित्त मुलांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दररोज हात स्वच्छ का धुवावा यांचे महत्त्व पटवून दिलं,यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितीन वसेकर सदस्या उषाताई वसेकर, अशोक माळी साहेब,माजी अध्यक्ष बिभिषण वसेकर मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे अंगणवाडी सेविका शालिनीताई खारे आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच बलवान भारत बनवण्याची स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचे आहे,असे मनोगत ज्ञानेश्वर दुधाणे यांनी व्यक्त करत वाफळकरवस्ती वरील पालक श्री. अशोक माळी यांनी शाळेसाठी एक वर्तमानपत्र सुरु करण्यासाठी मासिक वर्गणी देण्याचे जाहीर केले.