Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

लिटील चॅम्प मुग्धा वैशंपायन हिने "मुग्धरंगाने" विठूराया चरणी स्वरपुष्प अर्पण ; श्री विठूराया चरणी सेवा आयुष्यातील मोठा भाग्याचा क्षण - मुग्धा वैशंपायन

पंढरपूर प्रतिनिधी:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात गणेशोत्सव संगीत महोत्सवाच पाचवे स्वरपुष्प लिटील चॅम्...


पंढरपूर प्रतिनिधी:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात गणेशोत्सव संगीत महोत्सवाच पाचवे स्वरपुष्प लिटील चॅम्प मुग्धा वैशंपायन यांनी गुंफले, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य श्री संभाजीराजे शिंदे, मुग्धा वैशंपायन व कलाकारांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्व कलाकारांचा सन्मान समिती च्या वतीने करण्यात आला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली, सुरुवात वारकरी बीज मंत्र जय रामकृष्णहरी यांनी केली त्यानंतर विविध संतांच्या अभंगरचना त्यामध्ये सुंदर ते ध्यान,आम्ही विठ्ठलाचे वारकरी,पद्मनाभा नारायणा,विसावा विठ्ठल,सुखाचे जे सुख,पंढरीचा वास चंद्रभागे स्नान,आकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा,सोहम हर डमरु भाजे,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल अशा सुंदर अभंगरचनांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले,शेवटी अगा वैकुंठीया राया भैरवी ने कार्यक्रमांची सांगता केली.

रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला,त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत हार्मोनियम सुधांशू घारपूरे,तबला रुपक वझे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळसाथ अक्षय तळेकर यांनी अप्रतिम केली, संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन एस पी कुलकर्णी यांनी अप्रतिम सादर केले,यावेळी पंढरपूर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव संगीत यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.आज रात्री आनंद जोशी यांचा अभंगवाणी कार्यक्रम असून सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.