Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अजिंक्य तरुण मंडळा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

  उंबरे(पागे)/प्रतिनिधी- अजिंक्य बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित अजिंक्य तरुण मंडळ उंबरे (पागे) च्या वतीने सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात ...

 


उंबरे(पागे)/प्रतिनिधी- अजिंक्य बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित अजिंक्य तरुण मंडळ उंबरे (पागे) च्या वतीने सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात  गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.कोविडच्या काळात दोन वर्ष गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करता  आल्याने यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाच्या  वतीने दर वर्षी विविध विधायक  उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा करण्यात येत असतो. सालाबादप्रमाणे  मंडळा ने सामाजिक बांधिलकी जपत या वर्षीही रक्तदान  शिबिर घेऊन गणेशाचे स्वागत केले. याशिबिराचे उद्घाटन सरपंच प्रतिनिधी महादेव शिंदे,संचालक ज्ञानदेव ढोबळे,तंटामुक्ती अध्यक्ष अनिरुद्ध मुजमुले,राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे,स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अमर इंगळे या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या शिबिरातून 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून नवीन आदर्श समाजापुढे ठेवला.रक्तदात्यांना मंडळा तर्फे पाण्याचा जार, टी-शर्ट भेट वस्तू म्हणून वाटप करण्यात आले. सदर रक्तदानाचे संकलन शिव शंभो रक्तपेढी,मोहोळ यांच्यावतीने करण्यात आले.या पुढे विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं गणेश मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी चांगदेव अधटराव,विजय कानगुडे,नागेश लांबगुंडे,अंकुश व्यवहारे,भरत मुळे, शंकर भायगुडे,रुद्र व्यवहारे,राहुल गोरे,राहुल मुजमुले,विष्णू तळेकर,महादेव माळी,धनाजी मुळे,पांडुरंग माळी,परशुराम अधटराव  या रक्तदात्यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.