Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी पं शौनक अभिषेकी यांच्या स्वराभिषेकाने रसिक मंत्रमुग्ध

अखंडीत २३ वे वर्ष पं. शौनक अभिषेकी यांची विठ्ठला चरणी गायन सेवा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव संगीत महो...

अखंडीत २३ वे वर्ष पं. शौनक अभिषेकी यांची विठ्ठला चरणी गायन सेवा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे तिसरे स्वरपुष्प ख्यातनाम गायक पं शौनक अभिषेकी यांच्या स्वराभिषेकाने संपन्न झाले.सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव साहेब,पं शौनक अभिषेकी, सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,सदस्या शकुंतला नडगिरे पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री अरविंद माळी,यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.त्यानंतर गायनाला सुरुवात झाली सुरुवात अभिजात शास्त्रीय गायनाने केली त्यामध्ये त्यांनी मियां मल्हार रागामध्ये विलंबित एकतालामध्ये ख्याल व त्याला जोडून एक बंदिश गाऊन स्वरांनी विठ्ठलाचा स्वराभिषेक केला,त्यानंतर पं पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगरचना त्यामध्ये सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी,हरी भजना विन काळ,संतभार पंढरीत,अवघे गर्जे पंढरपूर,आदी सुंदर रचना गाऊन सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवीने कार्यक्रमांची सांगता केली,त्यांना तेवढीच उत्तम साथसंगत हार्मोनियम उदय कुलकर्णी, तबला प्रणव गुरव, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, स्वरसाथ राज शहा,टाळ अक्षय तळेकर, यांनी केली, यावेळी रसिकही चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे यावेळची ही गायन सेवा २३ वी असून श्रीविठूराया चरणी गायला एक वेगळी शक्ती मिळते अशीच सेवा अखंड घडू देत.असे मनोगत व्यक्त केले,संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी अधिकारी कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत,आज संध्याकाळी अंजली नंदीनी गायकवाड मुग्धा वैशंपायन, आनंद जोशी यांच्या कार्यक्रमांना सर्व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी केले आहे.