Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शिवरत्न गणेश मंडळाचा आहे वेगळाच ठसा... 'पोलीस तंदुरूस्त बंदोबस्त' उपक्रम उत्साहात साजरा...

शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम संपन्न झाला. शिवरत्न सामाजिक व संस्कृति...

शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक संस्था मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम संपन्न झाला.

शिवरत्न सामाजिक व संस्कृतिक संस्था, थोरली वेस्. करकंब यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधून 'पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम दरवर्षी करकंब  पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सातत्याने सण उत्सव व विविध बाबत बंदोबस्त करावा लागत असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या  आरोग्यासाठी  उपक्रमाचे आयोजन या मंडळाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात येते.

आज संपन्न झालेल्या या 'पोलीस तंदुरुस्त बंदोबस्त' कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक-निलेश तारू साहेब, तसेच पोलीस उपनिरीक्षक-महेश मुंडे साहेब, तसेच पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक-शशिकांत कवितकर, पोलीस उपनिरीक्षक संजय मंगेडकर, उपनिरीक्षक संजय फुगारे पोलीस अधिकारी सह करकंब पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ, पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित होते.


करकंब येथील थोरली वेस या ठिकाणी अनेक वर्षांपासून शिवरत्न सामाजिक बहुउद्देशीय संस्था गणेशाची स्थापना करत आहे.

हे मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासत, वर्गणीचे एकही पुस्तक न छापता, कुणालाही वर्गणी न मागता तरुण मंडळ एकत्रित येऊन हे मंडळ गेल्या वीस वर्षापासून गावात हा उत्सव साजरा करीत आहेत. राजकीय पुढारी,दुकानदार यांना कसलीही ते पावती मागत नाहीत.सभासद स्वखर्चाने गणेशाची स्थापना करतात. मूर्ती प्रतिष्ठापना करून सकाळ व संध्याकाळ सदस्यांच्या हस्ते आरती केली जाते.आरतीला प्रचंड गर्दी असते.

गणेश भक्त , नोकरी निमित्त बाहेरगावी कामाला गेलेली मुले दहा दिवस सुट्टी काढून गावाकडे या मंडळासाठी एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रम सादर करतात. यामध्ये पोलीस बांधवांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त ,रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर ,वृक्षारोपण, सामाजिक बांधिलकी पोस्टर प्रदर्शन व विविध स्पर्धा घेतल्या जातात. या मंडळामार्फत एक वेळी H I V तपासणी  शिबिर  घेतले होते. 'जल है तो कल है' याबाबत जनजागृती केली होती.

मंडळामार्फत शैक्षणिक खर्च करण्यासाठी पाच मुली दत्तक घेतल्या  होत्या,  पाचवी ते दहावी सर्व खर्च मंडळांनी केला आहे.



गणेश मूर्ती छोटी असते, पण त्याचा देखावा आकर्षक  केला जातो. यावर्षी जुन्यां प्रकारच्या पत्रवाळ्यात व द्रोण यांपासून सुंदर असा देखावा केला आहे.   गणपतीची मिरवणूक काढली जात नाही प्रतिष्ठापनाच्या ठिकाणी सजावट डेकोरेशन चांगल्या पद्धतीने केले जाते. ढोल पथक,लेझीम,

शस्त्र वापर  मुलांना शिकवलं जातं. मंडळात सर्व समाजाची मुले एकत्रित येऊन एक आदर्श गणेश मंडळ म्हणून शिवरत्न गणेश मंडळाकडे पाहिलं जातं आणि त्यांची परंपरा अशीच कायम त्यांनी ठेवलेले आहे.

शिवरत्न गणेश मंडळाचे धार्मिक कार्यक्रम व समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात.