Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सोलापूर येथे वन शहीद दिन व महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. करकंबच्या स्काऊट विद्यार्थ्यांचे झाले विशेष कौतुक

सोलापूर येथे वन शहीद दिन व महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.       करकंबच्या स्काऊट विद्यार्थ्यांचे झाले विशेष कौतुक      सोलापूर वन विभाग, सो...

सोलापूर येथे वन शहीद दिन व महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.      


करकंबच्या स्काऊट विद्यार्थ्यांचे झाले विशेष कौतुक     


सोलापूर वन विभाग, सोलापूर महानगरपालिका, स्काऊट गाईड कार्यालय व विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने आज दिनांक 11 सप्टेंबर 2022  वनशहीद दिनानिमित्त शहिदांना आदरांजली व वृक्षारोपण करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये वन विभाग, सोलापूर भारत स्काऊट गाईड व व इतर संस्थांनी ही सहभागी नोंदवला. सोलापूर भारत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरणाबाबत व वृक्षारोपणाबाबत विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

यामध्ये रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब व श्रीमती निर्मलाताई ठोकळ सोलापूर यांच्या बँड पथकाने सर्व सोलापूर वासियांचे लक्ष वेधून घेतले. ह्या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, दक्षिण सोलापूरचे आमदार मा. श्री सुभाष (बापू) देशमुख, वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्यशिल पाटील, रेल्वे विभाग अधिकारी शिवाजी कदम,माहीती प्रसारणचे अंकुश चव्हाण, माऊली झांबरे,वनविभागाचे इतर कर्मचारी, स्काऊट गाईड कार्यालयाचे सर्व कर्मचारी, शहरातील विविध शाळांतील स्काऊटर गाईडर व एकूण सातशे  स्काऊट गाईड उपस्थित होते.  

आज गौरव 5000 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट स्काऊट गाईड मार्फत पूर्ण केले. यावेळी सोलापूर शहरातील विविध शाळाबरोबरच रामभाऊ जोशी हायस्कूल च्या स्काऊट विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. उपस्थित सर्व स्काऊट-गाईड,  इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी, विविध पर्यावरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रामभाऊ जोशी प्रशालेतील स्काऊट विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन स्काऊट शिक्षक महादेव पुजारी, प्राचार्य हेमंत कदम यांचे अभिनंदन केले. उपस्थित पालक वर्ग व स्काऊट गाईड कार्यातील कर्मचारी सर्वांचे सोलापूर भारत स्काऊट गाईड कार्यालयाचे  स्काऊट संघटक श्रीधर मोरे साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले.सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले....