Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प. प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला छत्रपती परिवाराचा(मरवडे)जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार जाहीर ओ

  जि.प. प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला छत्रपती परिवाराचा (मरवडे) जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार जाहीर  जिल्हा परिषद प्राथमिक...

 

जि.प. प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला छत्रपती परिवाराचा (मरवडे) जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार जाहीर 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी)शाळेला यावर्षी मरवडे येथील छत्रपती परिवाराचा व स्व.आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्ट वतीने दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने २१ हजार रुपये खर्चून वृक्षारोपण करण्यात आले असून संपूर्ण शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला आहे,तसेच पालकांच्या ४ लाखांच्या शैक्षणिक उठावातून सर्व भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्यामध्ये डिजिटल वर्ग खोल्या,संगणक, झेरॉक्स,लॅमिनेशन मशिन,वॉटर फिल्टर,झाडांना ड्रीप,अद्यावत मुख्याध्यापक कार्यालय,प्रज्ञाचक्षू वाचनालय,अग्निपंख प्रयोगशाळा,अशा विविध सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा,तसेच दशसुत्री उपक्रमांतर्गत बाजार डे,रंगभरण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,मुलांचे वाढदिवस, सुसज्ज मैदान,यांचे आयोजन करण्यात येते,तसेच बार्डी ग्रामपंचायत वतीने ही वर्गखोल्या दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, शाळेसाठी कंपाऊंड, वस्तीसाठी पाण्याची टाकी,शुध्द पाणी फिल्टर, उपलब्ध करून देण्यात आला आहे,तसेच सोलापूर जिल्हा परिषद वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम अंतर्गत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला,तसेच या शाळेचे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सोलापूर जिल्हा परिषद सायकल बॅक उपक्रमांतर्गत दोन सायकली होतकरु मुलींना देऊन सामाजिक कार्याला खारीचा वाटा उचलला आहे, 


या सर्व गोष्टींचा विचार करुन सोलापूर जिल्हाभरात छत्रपती परिवाराचा मानाचा पुरस्कार जाहीर केला असून वाफळकरवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक वसेकर उपाध्यक्ष -नितीन वसेकर सर्व सदस्य सरपंच अभिजित कवडे,ग्रामसेवक चंद्रशेखर गिड्डे, कांतीलाल वसेकर,गोरख वसेकर,माजी अध्यक्ष बिभिषण वसेकर ज्ञानेश्वर वसेकर,सुनील वसेकर,हणमंत वसेकर,रमेश वसेकर, सुभाष वसेकर, दत्तात्रय वसेकर, मच्छिंद्र वसेकर,कैलास वसेकर, नवनाथ वसेकर,महेश वसेकर, ब्रह्मदेव वसेकर,अशोक माळी,शंकर माळी,रामदास माळी, समाधान वसेकर,रामा कवडे,विनोद वसेकर,संतोष माळी,सुदामा वसेकर,अरुण माळी,विठ्ठल कवडे,लक्ष्मण वसेकर,मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे सर्व पदाधिकारी,पालक तसेच सर्व ग्रामस्थांचे आणि महिलांच अनमोल सहकार्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचा अभिमान वाटतो.


तरी सुंदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३०वा. हुतात्मा मंदिर सोलापूर येथे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून सर्वांनी उपस्थितीत राहण्याची विनंती प्रशालेच्या वतीने करण्यात आली आहे.

.