Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अनेक समस्यांचा सामना करत प्राथमिक शिक्षक मनापासून ज्ञानदान करीत आहेत. युवा नेते - प्रणव परिचारक पंढरपूर तालुक्यातील 24 शिक्षक बांधव महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित.

अनेक समस्यांचा सामना करत प्राथमिक शिक्षक मनापासून ज्ञानदान करीत आहेत.                 युवा नेते - प्रणव परिचारक  पंढरपूर तालुक्यातील 24 शिक्...

अनेक समस्यांचा सामना करत प्राथमिक शिक्षक मनापासून ज्ञानदान करीत आहेत.

                युवा नेते - प्रणव परिचारक 

पंढरपूर तालुक्यातील 24 शिक्षक बांधव महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित.

       आज ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक हे शाळे मध्ये अनेक सुविधांचा अभाव असताना 100% भौतिक सुविधा उपलब्ध नसताना तसेच शेकडो अशैक्षणीक कामे असताना ही अनेक समस्यांचा सामना करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अगदी मनापासून ज्ञानदानाचे काम करीत आहेत.अनेक शाळा स्वखर्चाने व ग्रामस्थांचे मदतीने रंगरंगोटी करुन डिजिटल बनविल्या आहेत.कोरोना कालावधीत ही शासनास सहकार्य करीत जाॕबचार्ट मध्ये नसताना ही राष्ट्रीय कर्तत्व म्हणून हजारो बांधवांनी काम केले.शाळा बंद असताना ही आॕनलाईन अध्यापन करुन गुणवत्ता टिकवली.असे मत युवा नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केले.ते पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती व पंढरपूर तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचेवतीने घेण्यात आलेल्या महात्मा फुले गुणवंत शिक्षक/मुख्याध्यापक/पदवीधर शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

मंगळवेढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 24 पुरस्कार बांधवांचे अभिनंदन करुन.भविष्यकाळात याहून हि अधिक चांगले काम तुमचे हातून घडेल देशाचा भावी सुजान नागरिक घडविण्याचे आपण उत्तम कार्य करीत आहात असे मत व्यक्त केले.

शिक्षख समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे बापू यांनी शिक्षकांना येणाऱ्या समस्या व त्यासाठी संघटनेने केलेले आजपर्यंतचे कार्य याची माहिती बांधवांना सांगून पुरस्कार प्राप्त बांधवांची जबाबदारी आता या पुरस्कारामुळे वाढली असून यापुढे याहून ही प्रभावी असे काम तुमचे हातून घडेल असा विश्वास व्यक्त करुन काही अडचण आलेस शिक्षक समिती ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही ही उपस्थित बांधवांना दिली.

तालुकाध्यक्ष सुनिल कोरे सर यांनी आपले प्रास्ताविकात सदरचे पुरस्कार देताना आम्ही कोणाची ही फाईल घेत नाही तो शिक्षक कोणत्या संघटनेचा आहे ते पाहत नाही.तर केंद्रस्तरावर त्या केंद्रातील बांधवांशी चर्चा करुन माहिती घेवूनच सदरचे पुरस्कार जाहिर केले जातात.जिल्ह्यातील सर्वच बांधव अतिशय तळमळीने शाळेत काम करतात.सर्व बांधव गुणवंत आहेत.याचसाठी संघटनेच्यावतीने दरवर्षी आम्ही केंद्रनिहाय गुणवंत शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करतो.त्यांचे कामाचे मूल्यमापन करतो व त्यांना प्रोत्सहन देण्याचे काम संघटना व पतसंस्थेच्या माध्यमातून करत असतो असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी पुरस्कार प्राप्त बांधवातून श्रीम सरिता लोंढे मॕडम श्री बाळासाहेब पवार सर व दादा खांडेकर सर यांनी संघटनेने व पतसंस्थेने महात्मा फुले गुणवंत शिक्षक म्हणून आमची निवड केली त्याबद्दल आभार व्यक्त करुन आमचे कार्याचा कोणीतरी योग्य मूल्यमापन केले व आमच्या पाठीवर शाबासकिची थाप टाकली आता आम्हांला पूर्वी पेक्षा ही अधिकचे काम करावे लागेल अशा भावना व्यक्त केल्या.

चेअरमन विजयकुमार जाधव यांनी आपले मनोगतातून पतसंस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा सभासदां समोर मांडला.संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचेच आभार व्यक्त केले.

सचिव एकनाथ कुंभार यांनी विषयांचे वाचन करुन संस्थेला झालेला नफा व त्याची वाटणी तसेच अंदाजपत्रक तेरीजपत्रक व ताळेबंद या सर्वांचे वाचन केले सभासदांनी बहुमताने सर्व विषयांनी मंजूरी दिली.

यावेळी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी परिवर्तन पॕनलचे उमेदवार सुरेश शिंदे अमोगसिद्ध कोळी दत्तात्रय कोकडे प्रतिभा लिंबराज जाधव राम शिंदे प्रशांत काळे यास्मिन रोप- देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे जिल्हा उपाध्यक्ष डाॕ सचिन लादे सुरेखा इंगळे सल्लागार अनिल बंडगर प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब रायजादे सरचिटणीस पोपट कापसे मा.चेअरमन बालाजी शिंदे बलभिम जाधव महिला तालुकाध्यक्ष देवकी कलढोणे-दुधाणे सरचिटणीस अर्चना कोळी कार्याध्यक्षा अनिता माने कोषाध्यक्षा सुवर्णा टकले शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अरुण नागणे जूनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलाणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे बामसेफचे जिल्हाध्यक्ष सुनिल गाडे व्हा.चेअरमन रावण मदने सर्व संचालक व बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी तसेच शेकडो शिक्षक-बंधूभगिनी हे आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष सुनिल अडगळे सर व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे सर यांनी केले.आभार शरद गावडे सर यांनी मानले.