Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

विद्यार्थ्यांनी आपल लक्ष वाचन आणि अभ्यासाकडे केंद्रीत करावे.मा.लोहित मतानी (आयपीएस अधिकारी) वृक्षसंवर्धन हि निस्वार्थी सेवा आहे पर्यावरण रक्षण काळाची गरज:- धर्मगुरू कृष्णकांत गीते

  विद्यार्थ्यांनी आपल लक्ष वाचन आणि अभ्यासाकडे केंद्रीत करावे.मा.लोहित मतानी (आयपीएस अधिकारी) वृक्षसंवर्धन हि निस्वार्थी सेवा आहे पर्यावरण र...

 



विद्यार्थ्यांनी आपल लक्ष वाचन आणि अभ्यासाकडे केंद्रीत करावे.मा.लोहित मतानी (आयपीएस अधिकारी)

वृक्षसंवर्धन हि निस्वार्थी सेवा आहे पर्यावरण रक्षण काळाची गरज:- धर्मगुरू कृष्णकांत गीते

करकंब:-आज करकंब येथे विश्व अनहद संस्थेचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी मा.लोहित मतानी (भंडारा पोलीस अधीक्षक) धर्मगुरू कृष्णकांत गीते महाराज, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सिध्दांत गायकवाड मा.निलेशजी तारु साहेब,अमोल दादा शेळके,प्राचार्य किसन सलगर सोलापूर जिल्हा प्रमुख प्रमोद रेडे रमेश खारे, व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांचे शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.व नंतर मा. लोहित मतानी यांचं मार्गदर्शन करताना म्हणाले करकंब मध्ये वृक्षारोपण एकलव्य अभ्यासिका आणि स्वच्छता हे तिन्ही उपक्रम अतिशय महत्वाचे असून विद्यार्थ्यांना यश संपादन करायचे असल्यास नियमित वाचन केले पाहिजे, अपयशाने खचून न जाता आपलं वाचन निरंतर ठेवलं पाहिजे.वाचनामध्ये अभ्यासा बरोबर धार्मिक पुस्तकांचे ही वाचन केले पाहिजे.तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो म्हटले,यानंतर कृष्णकांत गीते महाराज यांनी ज्याप्रमाणे झाडांना ही परोपकारच करणच माहिती आहे आणि वृक्षारोपणाच महत्वाचं काम करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम करत आहे याचा आनंद वाटतो.खुप मोठं पुण्याचं काम आहे हे पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे तरच होणारा वातावरणात असलेलं प्रदुषण,कमी होईल असे सांगितले,तसेच सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी अमोल विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच करकंब ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले सुत्रसंचलन नंदलाल कपडेकर यांनी केले तर आभार प्रमोद रेडे पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल विद्यालयाचा शिक्षक स्टाफ, करकंब गावच्या लेकीचं झाड टीम,जागर टीम, एकलव्य अभ्यासिका टीम यांनी परिश्रम घेतले.