Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचा बाजार डे उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचा बाजार डे उत्साहात साजरा मा.गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे साहेबांची उपस्थिती नादब्रह्म फाउंडेशन...


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेचा बाजार डे उत्साहात साजरा


मा.गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे साहेबांची उपस्थिती


नादब्रह्म फाउंडेशन अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दुधाणे यांनी दोन मुलींना दिल्या सायकली भेट


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी)येथे जिल्हा परिषद सोलापूर मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,तसेच व्यवहारिक दृष्टीकोन समजावा,नफा तोटा याची कल्पना  मिळावी, यासाठी दशसुत्री कार्यक्रम अंतर्गत बाजार डे आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पंढरपूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक वसेकर, उपाध्यक्ष नितीन वसेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष कांतीलाल वसेकर, ग्रामपंचायत मा.उपसरपंच सुनिल वसेकर केंद्रप्रमुख कपीनंदन कांबळे, आप्पासाहेब माळी,सर्व ग्रामस्थ पालक,महिला, मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांचे उपस्थितीत शुभारंभ झाला.त्यामध्ये जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेतून सायकल बॅक या उपक्रमासाठी नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब संस्थापक अध्यक्ष व सहशिक्षक श्री. ज्ञानेश्वर दुधाणे यांनी वाफळकरवस्ती वरील सायकल अत्यावश्यक असणाऱ्या मुली कु.अमृता एकतपूरे आणि कु.राधिका पिसे यांना दोन सायकली भेट देण्यात आल्या,त्यानंतर मा.नाळे साहेबांनी मनोगतात एक दुर्गम भागातील शाळा असून प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे,शाळेचा परिसर ही अतिशय सुंदर स्वच्छ आहे.तसेच सायकल बॅक उपक्रमासाठी दोन सायकली भेट दिल्याबद्दल दुधाणे सरांचे अभिनंदन केले.तसेच सामाजिक पर्यावरण व स्वच्छता कार्यातही कौतुक केले.नंतर बाजार डे चा शुभारंभ झाला यावेळी बाजार डे उपक्रम सादर करुन मुलांचा उत्साह वाढला जातो,नफा तोटा या संकल्पना दृढ होतात, पैसे मोजण्याचा सराव होतो, त्यामुळे विद्यार्थी समाजामध्ये कसे वागावे याचे ज्ञान मिळते,असे उपक्रम प्रत्येक शाळेने राबवावेत असे सांगितले,त्यावेळी अनेक ग्रामस्थ,पालक,यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन मुलांनी आणलेल्या रान भाजीपाला, स्टेशनरी वस्तू,विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी केली,या बाजार डे मध्ये जवळजवळ ९ते १० हजाराची उलाढाल झालेली दिसून आली,मुले पैसे मोजतानाचा आनंद खरोखरच वाखाणण्याजोगा होता,यावेळी रामा कवडे,एल एम जाधव,मनिषा वसेकर,यांनी मनोगत व्यक्त केली, उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक वसेकर सर्व सदस्य मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे, हणमंत वसेकर, बिभीषण वसेकर,व सर्व पालकांनी सहकार्य करुन उपक्रम यशस्वी केला आभार उपाध्यक्ष नितीन वसेकर यांनी मानले.