Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साप्ताहिक करकंब दर्शन आयोजित गौरी गणपती ऑनलाईन आरास स्पर्धा 2022 चे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आज रविवारी

करकंब: साप्ताहिक करकंब दर्शन आयोजित गौरी गणपती ऑनलाईन आरास स्पर्धा 2022 चे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आज रविवारी गत अनेक वर्ष साप्ता...


करकंब: साप्ताहिक करकंब दर्शन आयोजित गौरी गणपती ऑनलाईन आरास स्पर्धा 2022 चे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आज रविवारी

गत अनेक वर्ष साप्ताहिक करकंब दर्शन गौरी गणपती आरास स्पर्धा राबवत आहे. सुरुवातीला साप्ताहिकाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येत होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यायला सुरुवात झाली. ऑनलाइन स्पर्धेला महाराष्ट्रातून व्यापक प्रतिसाद मिळत असल्याने आता ऑनलाइन स्पर्धेचीच परंपरा निर्माण झाली आहे. गौरी गणेश ऑनलाइन स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. अनेक स्पर्धकांनी यावर्षीही सहभाग नोंदवला होता परंतु स्पर्धेच्या नियमात न बसल्याने काही स्पर्धकांना स्पर्धेत समाविष्ट करून घेता आले नाही ‌ त्यामुळे एकूण 51 स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे दोन प्रकारे निकाल काढले जातात एक परीक्षक पसंती व दुसरा दर्शक पसंती अर्थात कमेंट्स वर आधारित. यावर्षीही प्रत्येक प्रकारात तीन तीन पारितोषिके न देता सर्वसमावेशक स्पर्धकांचा विचार करून स्पर्धकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे या हेतूने जवळ जवळ 15 पारितोषिकांचे वितरण आज मान्यवरांच्या हस्ते विशिष्ट सोहळ्यात संपन्न होणार आहे. यशस्वी स्पर्धकांनी आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे आज रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी चार वाजता गॅलेक्सी इंग्लिश मीडियम स्कूल, करकंबच्या सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.

स्पर्धेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/R4YxpFWaRhU 

निकालाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/M8sAp17k5ss