Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित माता रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिकांची उपस्थिती

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित माता रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिकांची उपस्थिती मंजुषाताई पाटील,राधा...


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित माता रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिकांची उपस्थिती

मंजुषाताई पाटील,राधा मंगेशकर, अपर्णाताई केळकर,संजय गरुड,धनंजय जोशी आनंद माडगूळकर यांची गायनसेवा
पंढरपूर प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित माता रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन मा.सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य व वि.रु.मं. कार्यकारी अधिकारी श्री. गजानन गुरव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व अधिकारी यांच्या अथक परिश्रमातून दिनांक २७सप्टेंबर ते ४ऑक्टोंबर दरम्यान रात्री ७:३०ते १० यावेळेत श्री संत तुकाराम भवन येथे  करण्यात आले असून यामध्ये दिनांक २७ रोजी ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषा ताई पाटील कुलकर्णी यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन दि.२८रोजी अपर्णाताई केळकर व संजय गरुड यांची अभंगवाणी दि. २९ रोजी तेजोमय नादब्रह्म पद्माकर कुरकुटे राधा घोसरवाडकर,भावगीत भक्तीगीत,दि. ३० ख्यातनाम गायक धनंजय जोशी नांदेड यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग २सप्टेंबर स्थानिक कलाकार सुशिल कुलकर्णी यांचा विविध मैफिल सप्तसुरांची ४सप्टेंबर गदिमा,बाबुजी  आणि मंगेशकर परिवाराने अजरामर केलेल्या गीतांचा कार्यक्रम आनंद माडगूळकर राधा मंगेशकर मनिषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रशांत पांडव, ज्ञानेश्वर दुधाणे केदार परांजपे,अजय अत्रे,प्रसन्ना बाम, अपूर्व द्रविड,निलेश देशपांडे कौशिक केळकर,निनाद देशपांडे,माधव लिमये,प्रशांत गाजरे, ऋषिकेश फरांडे,रूतिक कुरणे, रमजान बालेखान,रोहन शेटे,अभिनय रवंदे,अक्षय तळेकर,आदींची लाभणार आहे,तरी पंढरपूर व पंचक्रोशीतील कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक २०२२ साठी आपले लेख कविता विनोद पाककृती सुविचार पाठवा.
बातमी अणि जाहिराती साठी संपर्क:
9011634250

करकंब दर्शन आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त उखाणे स्पर्धा 2022
आपला व्हिडिओ बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाठवावेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा 9011634250 वर संपर्क साधा.
https://youtu.be/u03l1OXnPIs