Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

वार‌करीच्यां सेवेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूल येथे सर्वसेवा सज्ज.

  वार‌करीच्यां सेवेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूल येथे सर्वसेवा सज्ज. आली समीप पंढरी.... आस तुझ्या भेटीची विठ्ठला....  करकंब: आषाढी वारी निमित्त ...

 वार‌करीच्यां सेवेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूल येथे सर्वसेवा सज्ज.

आली समीप पंढरी....

आस तुझ्या भेटीची विठ्ठला....

 करकंब: आषाढी वारी निमित्त विठ्ठल भेटीची ओढ घेऊन निघालेल्या दिंडीचे करकंब येथे बुधवारी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे निवासाची सोय सुलभ व उत्तम प्रकारे व्हावी यासाठी रामभाऊ जोशी हायस्कूल येथे सर्व सोयी उत्तम प्रकारे करण्यात आल्या आहेत.पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी रामभाऊ जोशी हायस्कूल प्रशालेतील 30 खोल्या, पिण्यासाठी शुद्ध पाणी,क्रीडांगणाची स्वच्छता, अंघोळीची सोय, अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली आहे, करकंब ग्रामपंचायत यांच्या वतीने क्रीडांगणावर जेसीबीच्या साह्याने स्वच्छता करण्यात आली, शालेय समाजसेवा विषयांतर्गत संपूर्ण क्रीडांगणावर वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशालेतील स्काऊट गाईड विभागच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे क्रीडांगणाची साफसफाई केली आहे, प्रशालीमध्ये येणाऱ्या निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची निवास , कैकाडी महाराज पालखी, मार्कंडेय महामुनी दिंडी ,अहमदनगर येथील तुळशीराम महाराज दिंडी, जय श्रीराम दिंडी , या सर्व दिंडींचे निवास, आणखीन लहान मोठ्या दिंडी यांची राहण्याची सोय पावसाळ्यामुळे उत्तम प्रकारे व्हावी यासाठी प्रशालेतील प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे,स्काऊट विभाग प्रमुख महादेव पुजारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे सोय केली आहे. शाळा वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आली .

पाऊली चालती पंढरीची वाट ........ 

पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या वारकऱ्यांची, भेटीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या वारकऱ्यांनां सेवेसाठी प्रशाला प्रशासनने जय्यत तयारी केली आहे....