Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना सेवाभावी मदत ; रामभाऊ जोशी हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम ‌

करकंब पुण्यनगरीत   आलेल्या सर्व वारकऱ्यांना स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे व उस्फूर्तपणे आलेल्या सर्व वारकरी यांना तं...








करकंब पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकऱ्यांना स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे व उस्फूर्तपणे आलेल्या सर्व वारकरी यांना तंबूसाठी विशिष्ट जागा देणे, तंबूंची उभारणी करण्यास मदत करणे,वारकरी वाहने योग्य ठिकाणी पार्किंग करणे,निवाराची सोय करणे, प्लास्टिक मुक्त वारी करण्यासाठी सर्व वारकऱ्यांना प्लास्टिक एका ठिकाणी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशालेतील स्त्री पुरुष शौचालयाची सर्वांना माहिती करून देणे आणि शौचालयाचा वापर करण्याचे सर्वांना सांगणे, जिल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती पंढरपूर आणि ग्रामपंचायत करकंब यांच्या वतीने प्लास्टिक संकलन केंद्र प्रशालेत उभा करण्यात आल्याचे वारकरीनां सांगण्यात आले. त्यामध्ये सर्व वारकऱ्यांनी प्लॅस्टिक टाकावं असे स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी  सर्व तंबूतील वारकऱ्यांना आपली वारी...... प्लास्टिक मुक्त वारी...... संपन्न करण्याचे आवाहन करण्यात आले.शिल्लक अन्न, ओला कचरा एका ठिकाणी गोळा करणे इत्यादी विविध उपक्रम स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी आज प्रशालेमध्ये राबविले.या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.                                                 अतिशय उत्तमपणे वारकऱ्यांची सोय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाग घेतला, या भाग घेतलेल्या सर्व स्काऊट/गाईड विद्यार्थ्यांचे प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, शालेय मार्गदर्शन समिती, विद्यार्थ्यांनी विशेष कौतुक करण्यात आले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचे सेवाभावी उपक्रम पाहून सर्व वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.                                    ****************************** 

आली समीप पंढरी.......                              

आस तुझ्या भेटीची विठ्ठला......