Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे चौंडेश्वरी कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८जणांचे रक्तदान

  करकंब: श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट व समस्त करकंब ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.डाॅ.अभिजित नामद...

 
करकंब: श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट व समस्त करकंब ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.डाॅ.अभिजित नामदेव एम.डी.(मधूमेह स्पेशालिस्ट)अध्यक्ष मिलिंद उकरंडे,सचिव विजय भागवत, प्रभाकर टेके,धनंजय इदाते,संतोष पिंपळे,संजीवकुमार म्हेत्रे,संतोष बुगड,राजेंद्र टकले, जगन्नाथ दुधाणे,सुनिल दुधाणे,एस,बी.सी संघर्ष समितीचे अध्यक्ष जयंत टकले,  समस्त कोष्टी समाज बांधव, करकंब गावचे रक्तदाते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करुन  डॉ अभिजित नामदेव यांनी प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,लहान मुलांना हवाबंद खाऊ देऊ नका त्यामुळे भविष्यात अनेक रोगांना सामोरे जाव‌ लागेल, आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम आणि चाललं पाहिजे.शुगरच्या पेशंट नी प्रत्येक वर्षी शारिरीक तपासणी करून घेतली पाहिजे,सुंदर मार्गदर्शन केले,या रक्तदान शिबीरात एकुण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली,हे रक्तदानाचे १२वे वर्ष असून प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळतो रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे,विजय भागवत, अभिजित टेके,जयंत टकले,शंकर लाटणे,संजय दुधाणे,तरुण युवा कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.