Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने नाशिक सायकलिस्ट वारीचे करकंब मध्ये उत्साहात स्वागत

  करकंब सायकलीस्ट क्लब लवकरच स्थापन करणार वृक्षारोपण आणि पर्यावरण संतुलन काळाची गरज:- राजेंद्र वानखेडे सायकल नियमित चालवणे शारिरीक व्याधींवर...

 करकंब सायकलीस्ट क्लब लवकरच स्थापन करणार

वृक्षारोपण आणि पर्यावरण संतुलन काळाची गरज:- राजेंद्र वानखेडे

सायकल नियमित चालवणे शारिरीक व्याधींवर रामबाण उपाय:-मनिषा रौंदळ

 🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️

करकंब प्रतिनिधी:-प्रतिवर्षाप्रमाणे करकंब येथे नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशन च्या सायकल वीरांची सायकल वारीच आगमन करकंब गावा मध्ये झाले,त्यावेळी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने वृक्षारोपण व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.सुरुवातीला कनकंबा मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यामध्ये नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने,सचिव मनिषा रौंदाळ, श्रीकांत जोशी,सरोज वानखेडे,माधूरी गडाख,व वृक्षवल्ली टीमचे सागर शेलार आणि करकंब गावची लेक अनुराधा नडे व सर्व सायकलीस्ट वीर यांचं स्वागत सत्कार करकंब ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले,त्यानंतर मनोगतात डॉ.मनिषा रौदळ म्हणाल्या सायकलिस्ट फाऊंडेशन ची सुरुवात पोलीस आयुक्त हरिशजी बैजल यांच्या संकल्पनेतून १०जणांकडून सुरुवात केलेली टीम आज १०वर्षानंतर ३५०० जणांची टीम झाली आहे आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात सर्वांचं भरपूर सहकार्य लाभत आहे,त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी अनेक रोगांवर रामबाण उपाय सायकल नियमित चालवणे हा आहे सर्वांनी त्याचा सराव करावा सांगितले,तेंव्हा करकंब मध्येही सुरु असलेल्या करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान,, जागर स्वच्छता अभियान, एकलव्य अभ्यासिका,ग्रामीण भागात सुंदररित्या चालू आहे याचा खुप आनंद वाटतो म्हटले,त्यानंतर करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी लवकरच करकंब मध्ये करकंब सायकलिस्ट क्लब स्थापन करण्यात येईल आणि पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश देत दर आठवड्याला सायकल चालवण्याच महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले,यावेळी नादब्रह्म कला फाउंडेशन वतीनं सरबत वाटप व शशिकांत टकले यांचे वतीने पेढे वाटप करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे पांडुरंग काटवटे, नाना खारे,लालाजी पवार,चेतन पुरवत,शुभम टकले,नागेश खारे, प्रमोद रेडे, नंदलाल कपडेकर, कुमार टकले, चैतन्य टकले, शिवाजी टकले, श्रीकांत दुधाणे, विकास काटवटे,अमोल खारे, संदीप काटवटे,गणेश पिसे, वृषाली बोधे, गायत्री कुलकर्णी, अमृता रसाळ, वनिता दुधाणे, वैशाली टकले,,अरुणा टकले, शालीनी खारे,आदींनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.