Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम उपयुक्त-आण्णासाहेब कोरके

करकंब(ता.२८) जुलै मधील शिक्षण परिषदेचे आयोजन करकंब येथे करण्यात आले होते. परिषदेस परिपाठाणे सुरवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे ...




करकंब(ता.२८) जुलै मधील शिक्षण परिषदेचे आयोजन करकंब येथे करण्यात आले होते. परिषदेस परिपाठाणे सुरवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. कार्यक्रमास मा. श्री महारुद्र नाळे साहेब, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पंढरपूर,  श्री आण्णासाहेब कोरके सर, प्रमुख पाहुणे,  श्री हेमंत कदम, मुख्याध्यापक रामभाऊ जोशी हायस्कुल करकंब,  श्री मधुकर लोकरे,मुख्याध्यापक सुधाकरपंत परिचारक प्रशाला, करकंब यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

श्री आण्णासाहेब कोरके सर यांनी मा. मुख्य कार्यकारी आधिकरी, जि. प.सोलापूर यांच्या दशसूत्री कार्यक्रमातील स्पर्धा परीक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम उपयुक्त असल्याचे यावेळी ते म्हणाले.  श्रीम गुळमे मॅडम यांनी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले उपक्रम माहिती व सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले. निपुण भारत - FLN यांच्या अनुषंगाने भाषा व गणित विषयाची तयारी कशी आणि कोणते उपक्रम प्रभावी ठरतील ते सर्व उपक्रम घेतले. या विषयाची श्री खंदारे सर व श्रीम कलढोणे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्री विजय शिंदे सर, केंद्रीय मुख्याध्यापक यांनी मा. मुख्य कार्यकारी आधिकरी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या दशसूत्री उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यांचे मार्गदर्शन विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले. श्री आप्पासाहेब माळी केंद्रप्रमुख यांनी विद्याप्रवेश व दशसूत्री कार्यक्रम , Read to Me app, स्वाध्याय, तंबाखू मुक्त शाळा यावर मार्गदर्शन केले. श्री होटे सर यांनी सर्व मान्यवरांचे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार मानले. शिक्षण परिषदेची सांगता झाली.