Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री सद्गुरू बजरंगतात्या महाराज पिसे यांच्या समाधी मंदिर बांधकामासाठी वाफळकरवस्ती (बार्डी) ग्रामस्थांच्या वतीने १लाख रुपयांची देणगी

करकंब:-श्री सद्गुरू बजरंगतात्या महाराज पिसे यांचे संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्या दिवशी वैकुंठगमन झाले.तसेच त्यांच्या कृपाशीर्वादाने अ...



करकंब:-श्री सद्गुरू बजरंगतात्या महाराज पिसे यांचे संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्या दिवशी वैकुंठगमन झाले.तसेच त्यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताचे अखंड ३५वे वर्ष चालु असतानाच ही अत्यंत दु:खद घटना घडली,तेंव्हा श्री सिद्धनाथ मंदिरा शेजारीच सद्गुरू बजरंगतात्या महाराज यांचे समाधी मंदिर बांधण्याचा संकल्प सिध्दनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे,आता सद्गुरू बजरंगतात्या महाराज यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांचे नातू सुदाम महाराज यांना गादीवर बसवले असून त्यांच्या व शिष्यपरिवाराच्या वतीने भव्यदिव्य मंदिर बांधकामाला सुरुवात होणार असून त्याचा शिष्य परिवार व मनापासून प्रेम करणारी वाफळकरवस्ती ग्रामस्थांनी (हनुमान मंदीर) यांचे वतीने समाधी मंदिर बांधकामासाठी रोख एक लाख रूपयाची देणगी दिली.तसेच महादेव मंदिर (टेंभी) येथील शिष्य परिवारानेही रोख पन्नास हजार रुपये देणगी देऊन खारीचा वाटा उचलला,तसेच महाराष्ट्रातील नेक शिष्यवर्गांनी सप्ताहात साठी अर्थिक योगदान दिले,लवकरच समाधी मंदिर उभारणी साठी सर्व शिष्यवर्गांनी आपले अर्थिक योगदान देण्याचे आवाहन सिध्दनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.